सेलू( प्रतिनिधी )
नाशिक जिल्ह्यातील डोंगराळे भागात राहणाऱ्या निष्पाप चिमुकलीचा बलात्कार करून निर्घुण खून करण्यात आला या नीच वृत्तीचा निषेध करण्यासाठी आज सेलू सराफ व सुवर्णकार असोशिएशन यांच्या वतीने आप आपली प्रतिष्ठाने बंद करून मा.उपजिल्हाधिकारी,सेलू, मा.तहसीलदार,सेलू, मा.उपविभागीय पोलिस अधिकारी सेलू यांना निवेदन देऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांना सोनार समाजाच्या तीव्र भावना कळवून आरोपीला कठोर शासन करावे व पीडितेला न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली.
याप्रसंगी श्री.नंदकिशोर बहिवाल,श्री.नंदकिशोर राजुरकर,श्री परमेश्वर बोकन,श्री.संजय शेडूते,श्री सुनील वेदपाठक,श्री गोविंद सराफ, ॲड.श्री.गोपाळ बोकन,श्री संदीप शेडूते,श्री विनोद सराफ,श्री अभिजित राजुरकर,श्री वैजनाथ शहाणे,श्री नागेश शहाणे,श्री भगवान नालटे,श्री राहुल शेडूते,श्री राहुल टाक,श्री प्रकाश खांडविकर,श्री कमलाकर टाक,श्री सुनील बोकन,श्री गजानन कुलथे,श्री ज्ञानेश्वर शेडूते,श्री सनी शहाणे यासह सर्व समाजबांधव उपस्थित होते.
Shabdraj www.shabdraj.com