सेलू / प्रतिनिधी – येथील ब्राम्हण गल्ली मधील दत्त मंदिर मध्ये दत्त जयंती निमित्त दत्तजन्मोसव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे .
दि २८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत संपन्न होणाऱ्या या सोहळ्यात दररोज सकाळी दत्त मूर्तीस अभिषेक तसेच सकाळी ७ ११ या वेळेत गुरुचरित्र पारायण व त्यानंतर भिक्षाफेरी,दत्त पंचपदी व आरती होणार आहे . मधुकरराव वाकडीकर ,अरुनराव वाकडीकर ,रेणूकादासराव साळेगावकर तसेच बाबूराव कुंडीकर हे दत्त भक्त यावेळी गुरुचरित्र वाचन करणार आहेत . तसेच दररोज रात्री दत्तपंचपदी व गणपती अथर्वशीर्ष , विष्णुसहस्रनाम ,गीतेचा १२ वा व १५ वा अध्याय वाचन तसेच रामरक्षा पठन होणार आहे .
दि ४ डिसेंबर रोजी सकाळी श्री च्या मूर्तीस लघुरुद्र अभिषेक तसेच दुपारी साडेचार ते सहा या वेळेत बालकीर्तनकार ह भ प चि प्रद्युम्न प्रशांतराव सावरगावकर यांचे दत्त जन्म अख्यानावर कीर्तन होऊन दत्त जन्म साजरा केला जाणार आहे .व नंतर सामूहिक महाआरती होणार आहे .
दि ५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता भिक्षाफेरी, पंचपदी ,आरती व त्यानंतर दुपारी १ ते ४ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे .
तरी सर्व भाविक भक्तांनी या सोहळ्यात उपस्थित राहून दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक गुरुवार पाठ मंडळ यांनी केले आहे .
Shabdraj www.shabdraj.com