परभणी,दि 28
परभणी तालुक्यातील उजळांबा येथील वसंत विलास फॅमिली रेस्टॉरंटच्या परिसरात पार्वती परमेश्वर महादेव प्राणप्रतिष्ठा तसेच महंत,महाराज यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन रविवारी (ति.30) करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे महादेवाची प्राणप्रतिष्ठा ष.ब्र.प.पू. काशिनाथ शिवाचार्य महाराज पाथरीकर आणि कीर्तन महर्षी ह.भ.प. अच्युत महाराज दस्तापुरकर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
कार्यक्रमाच्या निमित्ताने सकाळी ११ ते १ या वेळेत ह.भ.प. जनार्दन महाराज खडकवाडीकर यांचे सुश्राव्य कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. कीर्तनाच्या माध्यमातून धार्मिक वातावरण अधिक रंगतदार होणार असून भाविकांना आध्यात्मिक उन्नतीचा अनुभव देणारा ठरेल. यासोबतच पंचक्रोशीतील सर्व मान्यवर महाराजांचा सत्कार सोहळाही या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. प्रांतातील संत—भक्तांच्या सहवासामुळे कार्यक्रमाला आध्यात्मिक तेज लाभणार आहे. कार्यक्रमानंतर लगेचच महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली असून भाविकांनी उपस्थित राहून या पवित्र सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन साखरे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
Shabdraj www.shabdraj.com