16/10/26
Breaking News

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 22 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द

सेलू / प्रतिनिधी – माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी केलेल्या “हार-तुरे-शाल, पोस्टरबाजी किंवा अन्य अनावश्यक खर्च न करता जनहितासाठी योगदान द्या” या आव्हानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यानुसार जिंतूर सेलू मतदारसंघातील सर्व बोर्डीकर प्रेमी तसेच आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या सहकार्याने जमा झालेली झालेले रक्कम *22 लाख रूपयाचा धनादेश आज नागपूर येथे मा .राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री ना . देवेंद्र फडणवीस यांच्या कडे सुपूर्द करण्यात आला .

या प्रसंगी तालुकाध्यक्ष गणेश काटकर, शहराध्यक्ष अशोक शेलार, प्रभाकर दादा वाघीकर, सुनिल भोंबे, अभिजित पारवे,गजानन बोर्डीकर, नामदेव काका आवटे आदी उपस्थित होते.

Check Also

हिंगोलीच्या खेळाडूंची सुवर्णभरारी!तायक्वांदोमध्ये पाच सुवर्ण व सहा रौप्य

हिंगोली,दि 11  परभणी येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालयात रविवार, दिनांक ११ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या …