पोलीस प्रशासनाची शहरात झडती मोहीम
सेलू / प्रतिनिधी – सध्या सर्वत्र पतंग उडविण्याचा हंगाम जोरात चालू असतानाच नायलॉन मांजाचा वाढता धोका लक्षात घेता .शहरात पोलीस प्रशासनाकडून मांजा विक्रेत्यांवर कार्यवाहीचा फास आवळणे सुरू केले असून शहरात नायलॉन गांजाच्या अनुषंगाने दुकानांची झडती मोहीम सुरू केले आहे . पोलीस निरीक्षक दिपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय बलभीम राऊत ,हेड कॉन्स्टेबल तेलंग व पुलाते व त्यांचे सहकारी ही मोहीम यशवीरित्या राबवित आहेत .
आतापर्यंत शहरातील तीन दुकानाच्या तपासणीत कुठेही मांजा आढळून आला नसून दुकानाच्या झडतीची प्रक्रिया सुरूच राहणार असल्याचे समजते .यामुळे मात्र नायलॉन मांजा विकणाऱ्यांचे चांगले च धाबे दणाणले आहेत .
गेल्या कांही वर्षात नायलॉन मांजा मुळे अनेक सायकल व मोटारसायकल स्वारकाचे गळे चिरण्याच्या घटना घडल्या असून बरेच वेळा ही बाब त्यांच्या जीवावर देखील बेतली आहे .या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजाच्या विक्रीवर आळा घालण्यासाठी परभणी पोलीस अधीक्षक रविंद्रसिह परदेशी यांच्या आदेशानुसार सेलू शहरात ही मोहीम प्रभावीपणे राबवली जात आहे .व दुकानात नायलॉन मांजाचा साठा आढळून आल्यास संबंधित व्यापाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल केला जाणार आहे .कोणत्याही दुकांदारामी अथवा नागरिकांनी ही कार्यवाही ओढवून घेऊ नये .असे आवाहन सेलू पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक दिपक बोरसे यांनी केले आहे .
पतंग उडविण्याचा आनंद असतो परंतु यामुळे कोणत्याही निष्पाप व्यक्तीचा बळी जाण्याची दुर्दैवी घटना या अत्यंत धारदार व मजबूत असलेल्या मांजा मुळे होऊ शकते .त्यासाठी पतंग उडविणाऱ्या शौकिनानी विशेष करून अशी दुर्घटना होणार नाही .यासाठी सतर्क राहून नायलॉन मांजाचा वापर टाळावा .नसता कठोर कारवाई साठी तयार राहावे .असेही पोलीस प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे .
Shabdraj www.shabdraj.com