सेलू / प्रतिनिधी – शहरातील मोंढा परिसरात असलेल्या गोदमातील किराणा माल चोरी प्रकरणातील आरोपीला सेलू पोलिसांनी एका दिवसात मुद्देमालासह अटक केली आहे.
शहरातील मोंढा भागात असलेल्या बालासाहेब सरकाळे यांच्या गोदाममधून दि १५ डिसेंबर चे मध्यरात्री नंतर अज्ञात चोरट्याने तूर डाळ ,तांदूळ ,साबुदाणा कट्टे व साबण बॉक्स असा एकूण ३९५१०/- रुपयांच्या मालाची चोरी केली .सरकाळे यांच्या फिर्यादीवरून सेलू पोलिसांत १६ डिसेंबर रोजी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता .व पोलीस निरीक्षक दिपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू केला होता.
सेलू पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून दि १७ डिसेंबर रोजी यातील आरोपी राजासिंग मंगलसिंग दुधानी (१९) राहणार विकासनगर ,परभणी यास ताब्यात घेतले असून त्याच्या किराणा सामान व एक गाडी असा एकूण ३,३७,६९४/- रुपयाचा मुद्देमाल देखील हस्तगत केला आहे.
Shabdraj www.shabdraj.com