04/02/26
Breaking News

योग क्षेत्रातील योगदानासाठी डॉ.मंजुषा जामगे डॉक्टरेट मानध उपाधीने सन्मानित

गंगाखेड / प्रतिनिधी – योग या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल गंगाखेड येथील डॉ.मंजुषा जामगे यांना मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड युनिव्हर्सिटी,फरीदाबाद (हरियाणा) येथे आयोजित समारंभात मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

 

डॉ.मंजुषा जामगे यांनी योग, प्राणायाम व पद्धतींच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांपर्यंत आरोग्यजागृती पोहोचविली आहे.विविध ठिकाणी आयोजित योग शिबिरे,प्रशिक्षण वर्ग तसेच नैसर्गिक उपचारांविषयी जनजागृतीमुळे अनेक नागरिकांना निरोगी जीवनशैलीचा लाभ झाला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन हा सन्मान देण्यात आला.मानद डॉक्टरेट स्वीकारताना डॉ.मंजुषा जामगे यांनी हा सन्मान योग क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना समर्पित करत,भविष्यातही समाजाच्या आरोग्यासाठी कार्य सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

 

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सी.पी.यादव (चेअरमन, मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड), डॉ.राजेंद्र सैनी (वर्ल्ड वाईड मास्टर ट्रेनर,न्यूयॉर्क रेड क्रॉस), डॉ.राम अवतार शर्मा (वरिष्ठ अधिवक्ता, सुप्रीम कोर्ट), डॉ.हरिओम शर्मा (सामाजिक कार्यकर्ते), आर. पी. हँड (जनरल मॅनेजर, ब्राऊन लॅबोरेटरी) तसेच डॉ.निरंजन बिशी (राज्यसभेचे खासदार)उपस्थित होते. डॉक्टरेट उपाधी मिळाल्याने डॉ.मंजुषा जामगे यांचे डॉ.भागवत योगी (अंकशास्त्र तज्ञ), डॉ.प्रतिभा वाघमारे,डॉ संघरक्षित गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या तसेच सर्व स्तरातून जामगे यांचे अभिनंदन होत आहे

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …