04/02/26
Breaking News

बांधकामावरील मजुराचा लोअर दुधनाच्या डाव्या कालव्यात पडून मृत्यू

सेलू ( प्रतिनिधी )
तालुक्यातील सोनवटी ( खापरखुंटी ) येथील व्यंकटी धुमाळ यांच्या बांधकामावरील मजूर काम करणारा मुलगा नामे साजिद मजीद शेख (१७)वय रा. राजमोहल्ला, सेलू याचा त्याच शिवारातील निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात वाहून गेल्याने दुर्दवी मृत्यू झाल्याची दुर्घटना दि १७/१२/२५ बुधवार रोजी घडली आहे .सदरील प्रकरणी सेलू पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सेलू पोलीस करीत आहेत . घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे कुटूंबाला मदत व्हावी यासाठी साजीत हा तालुक्यातील सोनवटी येथे बांधकामावर मजुरी करीत होता .तो सायंकाळी पाच च्या सुमारास शौचास जाण्यासाठी सोनवटी शिवारातील निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून पाणी घेण्यासाठी उतरला असताना पाण्यात घसरून वाहून गेला आहे.
घटनेची माहिती मिळताच वाहून गेलेल्या सदर तरुणाचे शोधकामी पोलीस निरीक्षक दिपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उप नि.बलभीम राऊत, पोलिस हवालदार सूर्यवंशी, पोलीस शिपाई आघाव, डुबे असे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले .कालव्याच्या बाजूलाच त्याच्या कांही वस्तू आढळून आल्यामुळे तो कालव्यात वाहून गेल्याचा अंदाज घेऊन त्यांनी सोनवटी येथील पोलीस पाटील माणिकराव सोळंके, हतनूर चे पोलीस पाटील रामचंद्र पारवे इतर ग्रामस्थ व सदर युवकाच्या नातेवाईकांना सोबत घेऊन शोध कार्य सुरू केले . परंतु कालव्यातील जास्त पाणी व अंधारामुळे युवकाचा शोध लागला नसल्याने आज दि १८/१२/२५ गुरुवार रोजी सकाळी पुन्हा ही शोध मोहीम सुरू करण्यात आली .
तेव्हा कालव्याच्या खोल पाण्यात साजिद चा मृतदेह आढळून आला .रीतसर पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सेलूच्या उपजिल्हारुग्णालयात आणण्यात आला .
घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असतांना साजीत च्या मृत्यू मुळे कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे .

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …