सेलू / प्रतिनिधी – शहराचे ग्रामदैवत केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या मंदिरात दि २४ डिसेंबर पासून परम पूज्य माधवाश्रम स्वामी महाराज यांच्या ७६ व्या पुण्यतिथी सोहळ्यास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे .
आज सकाळी प पू माधवाश्रम स्वामी महाराजांच्या प्रतिमेचे तसेच स्थापीत देवतेचे व कलश पूजन मंदिर चे पुजारी केशवराव मंडलिक यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी बालासाहेब खापरखुंटीकर ,सुधीर मंडलिक यांनी पौरोहित्य केले .रेणूकदास साळेगावकर यांनी अखंड गुरुचरित्र पारायण सुरू केले .यावेळी सर्व शिष्य परिवार व भाविक भक्ताची उपस्थिती होती .
दि २४ ते ३१ डिसेंबर या कालावधीत संपन्न होत असलेल्या पुण्यतिथी सोहळ्यात अखंड गुरुचरित्र पारायण तसेच श्रीमद भागवत ज्ञान यज्ञा तसेच दररोज रात्री पंचपदी अशा विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .
दि २४ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत दररोज सकाळी ११ ते ४ यावेळेत वे शा सं , ह भ प भागवताचार्य दत्तात्रय महाराज गोंदीकर यांच्या अमृततुल्य व रसाळ वाणीतून भागवत कथेचे निरूपण केले जाणार आहे .तसेच दररोज रात्री ९ ते ११ या वेळेत पंचपदी भजन होणार आहे .
दि ३० डिसेंबर २०२५ रोजी प पू माधवाश्रम स्वामी यांची पुण्यतिथी असल्यामुळे त्यांचे पुण्यतिथी श्राद्ध केले जाणार आहे .
तसेच रात्री ८ ते १० यावेळेत कीर्तन सम्राट ह भ प सुनील महाराज यांचे प पू माधवाश्रम स्वामी महाराजाच्या जीवन चरित्रावर सुश्राव्य कीर्तन आयोजित करण्यात आले आहे .( प्रायोजक सौ सुनंदा सुधीर डांगे व श्रुती गोपालजी झंवर )
३१ डिसेंबर २०२५ रोजी अखंड गुरुचरित्र पारायण समाप्ती ,भागवत कथा समाप्ती तसेच दुपारी २ वाजता समाराधना पंचपदी ,कलश तीर्थ पूजन तसेच नेवैद्य व महाआरती नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे .
यावर्षीची श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सेवा कै विजयकुमार डांगे याच्या स्मृती प्रित्यर्थ सौ सुनंदा सुधीर डांगे यांच्या वतीने आहे .
तरी सर्व भाविक भक्तांनी या सर्व कार्यक्रमास उपस्थित राहून कथा श्रवण ,दर्शन तसेच तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा .असे आवाहन सर्व शिष्य परिवार व आयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे .
Shabdraj www.shabdraj.com