24/03/26
Breaking News

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त सेलूत पत्रक वाटून जनजागृती

सेलू,दि 28 ः
राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक दिंडी पंधरवाडा उपक्रमात आज दि २७ डिसेंबर रोजी पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली .

शहरतील सातोना रोड वरिल मॉर्निंग वॉक ग्रुप व केशवराज बाबासाहेब विद्यालयात
ग्राहक संरक्षण कायदा १९८६ व २०१९ अंतर्गत आपणास मिळालेले अधिकार याबाबत चे पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली.यायाप्रसंगी मॉर्निंग वॉक ग्रुपचे सर्व सदस्य व के.बा विद्यालय या शाळेतील विद्यार्थी मित्र तसेच शिक्षक वृंद व अखिल भारतीय ग्राहक पंचायत सेलूचे तालुका अध्यक्ष सतिश जाधव , तालुका सचिव गंगाधर कान्हेकर, तालुका उपाध्यक्ष रविकांत कुलकर्णी तालुका सहसचिव सुनील गायकवाड, संघटक सिद्धार्थ गायकवाड , कोष्याध्यक्ष के. डी. वाघमारे, आयटी सेल प्रमुख मंजुषा कुलकर्णी, पर्यावरण आयाम प्रमुख नागोराव देशमुख
प्रसिद्धी प्रमुख पि एस कौसडी कर, कार्यवाहक सचिन कोरडे सदस्य शुकाचार्य शिंदे , डॉ रमेश वाघचौरे आदींची उपस्थिती होती .

Check Also

ओंकार वृद्धाश्रमात किराणा साहित्याचे वाटप करून महिला दिन साजरा

पाथरी प्रतिनिधी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत सामाजिक बांधिलकी जपत एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. …