परभणी,दि 29 ः
दैठणा पोलीस स्टेशन येथे पोलीस अधिक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी सोमवारी (दि.29) सहारा रुग्णवाहीकेच्या माध्यमातून अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णालयात घेऊन जाणारे सामाजिक कार्यकर्ते बाबा शेख यांचे कौतुक करत सत्कार केला.
परभणी जिल्ह्यात अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळावी यासाठी बाबा शेख यांनी व्हाटसॅप ग्रुप तयार करुन अनेकांना तातडीने उपचार मिळवुन दिला आहे.त्यांच्या कार्याची दखल पोलीस अधिक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनीही घेतली.दैठणा येथे आले असता पोलीस अधिक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी बाबा शेख यांची अस्थिवाईकपणे चौकशी केली त्यासोबतच बाबा आपल्या ग्रुप च्या माध्यमातून करत असलेल्या कार्याबद्दल शुभेच्छा दिल्या मी नेहमी बातम्यांमध्ये तुमचं नाव वाचतं असतो असे सांगताना कालच्या काळविटाच्या बातमीचाही उल्लेख केला आणि या कार्यासाठी पोलीस दल नेहमीच आपल्या सोबत राहील अशा आश्वासन त्यांनी बाबा यांना दिले.
Shabdraj www.shabdraj.com