25/06/26
Breaking News

आखाड्यावर आग लागून दोन बैलांचा मृत्यु,धनेगाव येथील घटना

सेलू ( प्रतिनिधी )
तालुक्यातील धनेगाव येथे शेत आखाड्यावरील शेड मध्ये शॉट सर्किटने आग लागून झालेल्या नुकसानीत शेतकऱ्याचे २ लाख ८० हजारांचे नुकसान झाले आहे.काल रात्री साडेबारा वाजता धनेगाव शिवारातील गट नंबर १४१ मध्ये धनेगाव येथील रामभाऊ देविदासराव कटारे यांच्या आखाड्यावरील शेडमध्ये शॉट सर्किट ने अचानक आग लागली.यामध्ये १५ क्विंटल कापूस,८ क्विंटल सोयाबीन तसेच लाल कंधारी जातीची मोठी बैलजोडी जळून खाक झाली.यामध्ये शेतकऱ्याचे जवळपास २ लाख ८० हजारांचे नुकसान झाले आहे.घटनेची माहिती मिळताच गावचे पोलीस पाटील नरहरी कटारे यांनीही घटनास्थळाकडे धाव घेत मदत करण्याचा प्रयत्न केला.रीतसर तक्रार दिल्यानंतर मंडळ अधिकारी विजय बोधले यांनी पंचनामा केला आहे.तसेच बिट जमादार ज्ञानेश्वर जाणगर, संदीप शिंदे,पशुवैद्यकीय अधिकारी डॉ संग्राम रामाने आदींनी भेट दिली.
या शॉट सर्किट ने लागलेल्या आगीत शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शासनाने तातडीने मदत करावी अशी मागणी शेतकरी करीत आहे.

Check Also

स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटी पूर्ततेसाठी अंतिम मुदतवाढ

हिंगोली, दि. २४ : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळू न शकलेल्या …