04/02/26
Breaking News

मूल्यवर्धन प्रशिक्षण कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये मूल्य रुजवण्यासाठी प्रयत्न करावेत- प्राचार्य सुदर्शन चिटकुलवार

पुर्णा :(सुशिलकुमार दळवी)
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक परिषद पुणे आणि शांतीलाल मुथा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय मूल्यवर्धन प्रशिक्षण टप्पा क्रमांक दोन अभिनव विद्या विहार प्रशाला पूर्णा येथे दिनांक 29 डिसेंबर 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत पार पडला.

या प्रशिक्षण स्थळाला जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था परभणीचे प्राचार्य सुदर्शन चिटकुलवार आणि वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ प्रल्हाद खुणे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी प्रशिक्षणार्थीशी संवाद साधला. सध्याच्या युगात मानवी आणि घटनात्मक मूल्यांचा ऱ्हास होताना दिसून येत आहे. ही मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याची प्रामुख्याने जबाबदारी म्हणून शिक्षक म्हणून आपल्यावर आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपण विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये मूल्य रुजवावीत असे आव्हान प्राचार्य चिटकुलवार यांनी केले. यावेळी वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. प्रल्हाद खुणे यांनी देखील प्रशिक्षणार्थी बांधवांशी संवाद साधत शैक्षणिक गुणवत्तेत परभणी जिल्ह्याला कसे पुढे नेता येईल याचा आराखडा मांडला. यावेळी गटशिक्षणाधिकारी बालाजी कापशीकर ,तालुका प्रशिक्षण समन्वयक अनिल ढाले यांची उपस्थिती होती. या प्रशिक्षणासाठी सुलभक म्हणून अनिल ढाले, रवींद्र हनुमंते, अमोल देशपांडे, वेंकटरमन जाधव, संतोष रत्नपारखे, मारुती डोईफोडे, सतीश चोले, नारायण आसुरे, ज्ञानेश्वर ननूरे , उमाकांत स्वामी, शिवाजी कातकडे,नागेश हिमटे, केशवभावे, एन एम कुकडे, डीडी डोणगावकर आदींनी काम पाहिले. प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी प्रशिक्षण प्रमुख अनिल ढाले शांतीलाल मोठा फाउंडेशन तालुका समन्वयक गीरीष येंगडे, राजू फुलवळे, प्रकाश जाधव,शिवाजी लोखंडे,केशव सांडवे,जीवन खांडेकर,श्रीमती सुजाता वाघमारे आदिं परिश्रम घेत आहेत.प्रशिक्षणाला धम्मानंद खंदारे, विनोद मुखेडकर, तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा व खाजगी शाळांचे एकूण दोनशे प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …