04/02/26
Breaking News

जि प प्राथमिक शाळा नामदेव नगर येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

पाथरी प्रतिनिधी
3 जानेवारी शनिवार रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नामदेव नगर येथे बालिका दिन साजरा करण्यात आला सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नवनिर्वाचित नगरसेवक गोविंद हरकळ त्याचबरोबर नगरसेवक अमोल भाले उपस्थित होते. शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर राऊत व सर्व समिती सदस्य उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक शिंदे सर व सर्व सहकारी त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते दिपक कटारे, मुरली चिंचाणे , शरद भाऊ वांगीकर, शरद गिराम, सचिन चौधरी, ज्ञानोबा वांगीकर, मोहन गोरे, माऊली चिंचाणे, अशोक गायकवाड, विष्णु शिंदे, मनोहर हारकळ, अरुण चिंचाणे, रामेश्वर मंगरूळकर,कृष्णा,ओंकार शिंदे, महारुद्र चिंचाणे व चाफेकर ताई त्याचबरोबर बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.
बालिका दिनानिमित्त विद्यार्थ्यांची भाषणे व त्याचबरोबर शिक्षकांनीही सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले . नगरसेवक गोविंद हरकळ यांनी शाळेसाठी सर्वप्रथम मदत करण्याचे ठरवले. त्यामध्ये शाळेला वॉल कंपाऊंड, पाण्यासाठी बोरवेल मोटर, पाण्याची टाकी या सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन दिले.

आज बालिका दिनानिमित्त गावकऱ्यांनी तारेच्या कंपाउंड साठी रोख रक्कम नगरसेवक गोविंद हारकळ यांच्याकडून 1000रु, मुरली भाऊ चिंचाणे 1500रु, शरद वांगीकर 1000रु, अशोक गायकवाड 500रु अशी रोख रक्कम चार हजार रुपये जमा झाले व अजून लवकरच लागणारी रक्कम जमा करण्यात येणार आहे. आज खऱ्या अर्थाने गावकऱ्यांनी बालिका दिन साजरा केला. बालिका दिनानिमित्त विद्यार्थ्यांना रुचकर पुलाव ,जिलेबी व भजे याची मेजवानी मिळाली.
शाळेच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय शिंदे सर यांनी सर्वांचे आभार मानले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आदरणीय आंबेकर सर सूर्यवंशी मॅडम यांनी विशेष प्रयत्न केले.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …