04/02/26
Breaking News

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त केमापूर शाळेत गणित जत्रा

सेलू (प्रतिनिधी)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केमापूर येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती व बालिका दिनानिमित्त गणित जत्रेचे आयोजन करण्यात आले होते.
गणित जत्रा हा विद्यार्थींच्या गणिती संकल्पना स्पष्ट होण्यासाठी उपयुक्त उपक्रम असल्याचे जेष्ठ शिक्षक नारायण अष्टकर यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना स्वतःपैसे खर्च करताना आणि विविध वस्तुंची खरेदी- विक्री करताना गणित विषयातील बेरीज, वजाबाकी, भागाकार,गुणाकार, किलो ग्रॅम आणि मापनाच्या क्रिया करत असताना विद्यार्थी खऱ्या अर्थाने जीवन शिक्षण घेतात असेही यावेळी ते म्हणाले.
यावेळी कविता केंद्रे,वैशाली आंधळे,पुष्पा सारोक,संगिता गुठ्ठे अन्नपूर्णा गुठ्ठे,रत्नमाला सारोक,एकनाथ सारोक,संतोष आंधळे मंचावर
उपस्थित होते.
शाळेतील विद्यार्थींनी भेळ,पाणीपुरी,उसळी, कचोरी,समोसा,पेढा,
गुलाब जामुन असे विविध खाद्यपदार्थ, मिरची,टोमॅटे, पालक,मेथी, वांगी ,गाजर हा भाजीपाला विक्री करण्यासाठी आणला होता.यावेळी विद्यार्थी फुले व सावित्रीबाई यांचा वेश परिधान करून आली होती.
गावातील पालकांनी खरेदी करून मुलांच्या गणिती कौशल्यांचा अनुभव घेत प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभावती घुगे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रणिता गाडे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शकुंतला आंधळे,कल्पना पालवे,मंडोदरी आंधळे यांनी पुढाकार घेतला.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …