जिंतूर : दर्पण दिनाच्या औचित्याने जिंतूर तालुका प्रेस क्लब व व्हाईस ऑफ मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांसाठी दि .६ जानेवारी रोजी आयोजित विशेष कार्यक्रमात ५२ पत्रकारांना सुमारे साडेसात कोटी रुपयांच्या विमा पॉलिसीचे मोफत वाटप करण्यात आले. पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी व सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
भारतीय डाक विभागाच्या माध्यमातून आदित्य बिर्ला कंपनीची वार्षिक ७४९ रुपयांची १५ लाख रुपयांची विमा पॉलिसी पत्रकारांना मोफत उपलब्ध करून देण्यात आली. हा कार्यक्रम जिंतूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ नगरकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष प्रताप देशमुख, पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे, गटविकास अधिकारी सुभाष मानकर, उद्योजक ब्रिजगोपाल तोष्णीवाल, प्राचार्य श्रीधर भोंबे, नगरसेवक गटनेते सचिन गोरे, नगरसेवक प्रदीप चव्हाण, गोपाळ रोकडे, ह.भ.प. संदीपभाई शर्मा महाराज, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेश दरगड, मनोज सारडा, डॉ. दुर्गादास कान्हडकर आदी उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार म्हणून राजाभाऊ नगरकर, प्रवीण मुळी, किसनप्रसाद खाडे, दीपक राजुरकर व मंचकराव देशमुख यांचा शाल, श्रीफळ, डायरी व पेन देऊन सन्मान करण्यात आला. तसेच सुधीर शहाणे, देवेंद्र भुरे, गणेश कुरे, राजेंद्र देवकर, किशोर देशपांडे, कमल किशोर जयस्वाल, गजानन येरमवार, मनोज चवडे, संतोष चौधरी, ॲड. सुनील मते, कैलास खंदारे, सुनील वट्टमवार, सुदर्शन अच्छा, अशोक अच्छा, सागर चिद्रवार, विनोद राठोड, रवी घुगे, अभिजीत देशमुख, सुशील काबरा, सुनील तोष्णीवाल, कृष्णा चिद्रवार, शिवाजी देवळे, सुधाकर जाधव यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय चोरडिया यांनी केले तर आभार प्रदर्शन ॲड. मनोज सारडा यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्हाईस ऑफ मीडिया व जिंतूर तालुका प्रेस क्लबच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
…नवनिर्वाचित नगराध्यक्ष व सदस्यांचा सत्कार..
नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रताप देशमुख तसेच नगरसेवक गटनेते सचिन गोरे, प्रदीप चव्हाण व गोपाळ रोकडे यांचा व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने शाल, श्रीफळ व फेटा बांधून गौरव करण्यात आला.
..“लवकरच अद्यावत नाट्यगृह उभारणार”..
शहरातील सांस्कृतिक व सामाजिक चळवळ अधिक बळकट व्हावी यासाठी नगर परिषदेच्या वतीने अद्यावत असे नाट्यगृह लवकरच सुरू करण्यात येईल. सांस्कृतिक उपक्रमांना पूर्ण ताकदीने सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रताप देशमुख यांनी यावेळी केले.
Shabdraj www.shabdraj.com