25/06/26
Breaking News

श्रीराम प्रतिष्ठानच्या प्रगतीत व जडणघडणीत पत्रकारांचा मोठा वाटा- डॉ.संजय रोडगे

सेलू ( प्रतिनिधी )
जगासोबत स्पर्धा करा हे ब्रीद वाक्य उराशी बाळगून व सकारात्मक विचार सोबत घेऊन स्थापन झालेल्या श्रीराम प्रतिष्ठानच्या इवल्याशा रोपट्याचे जे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे .त्यामध्ये पत्रकारांचा मोठा वाटा असल्याचे प्रतिपादन प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ संजय रोडगे यांनी पत्रकारांच्या सत्कार सोहळा प्रसंगी केले .

दर्पणदिनानिमित श्रीराम प्रतिष्ठाण च्या वतीने पत्रकारांच्या सत्काराचे आयोजन दि ७ जानेवारी रोजी रवळगाव रोडवरील विद्याविहार सकुंलनात करण्यात आले होते .त्यावेळी डॉ संजय रोडगे बोलत होते .

यावेळी व्यासपीठावर डॉ संजय रोडगे ,व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष शिवाजी आकात ,अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण बागल यांची उपस्थिती होती .

समाजाच्या जडणघडणीत लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची भूमिका प्रामाणिकपणे पार पाडणाऱ्या उपस्थित सर्व पत्रकारांचा यावेळी यथोचित सन्मान करण्यात आला.यावेळी बोलताना डॉ. संजय रोडगे पुढे म्हणाले की,
“पत्रकारिता म्हणजे केवळ बातम्यांचे संकलन नव्हे, तर समाजातील वास्तव आरशासारखे मांडण्याचे धाडस आहे. सत्य, पारदर्शकता आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांवर पत्रकार काम करत असतात. अनेक अडचणींवर मात करत पत्रकार समाजहितासाठी सतत कार्यरत राहतात, हे कार्य प्रेरणादायी आहे.
पत्रकारांनी समाजातील अपप्रवृत्तीच्या पाठीशी न राहता सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन चांगल्या कामाची नोंद घ्यावी .कारण सेलू शहराचे नावं उज्वल करण्यासाठी सकारात्मक विचारांची गरज असल्याचे स्पष्ट केले .
तसेच समाजाला योग्य दिशा देणाऱ्या सकारात्मक पत्रकारितेच्या पाठीशी नेहमी ठामपणे उभे राहण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डिगंबर टाके यांनी केले .

Check Also

स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटी पूर्ततेसाठी अंतिम मुदतवाढ

हिंगोली, दि. २४ : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळू न शकलेल्या …