22/03/26
Breaking News

महिलांच्या स्वावलंबनासाठी शुभंकरोती फाउंडेशनचे कार्य उल्लेखनीयच- उदय जाधव

सेलू ( प्रतिनिधी )
शुभंकरोती फाऊंदेशन चे कार्य निश्चितच महिलांच्या स्वावलंबनासाठी उलेखनियच ठरणारे आहे .असे प्रतिपादन सेलू पंचायत समितीचे गट विकास अधिकारी उदय जाधव यांनी प्रशिक्षण केंद्राच्या भेटी दरम्यान केले .

महिलांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने कार्यरत असलेल्या शुभंकरोती फाउंडेशन, सेलू येथे महिलांसाठी सुरू असलेल्या ब्युटी पार्लर व शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्रास आज श्री. उदय जाधव तसेच श्री. भाऊसाहेब खरात (बालविकास प्रकल्प अधिकारी, सेलू) यांनी आज सदिच्छा भेट दिली.

या वेळी शुभंकरोती फाउंडेशनमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षण व सामाजिक उपक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली. संस्थेने आजपर्यंत शिलाई मशीन, ब्युटी पार्लर व संगणक प्रशिक्षणाच्या माध्यमातून सुमारे ३७५० महिलांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.
तसेच संस्थेमार्फत कॅण्डल मेकिंग, ज्वेलरी मेकिंग, चॉकलेट मेकिंग, मेहंदी प्रशिक्षण आदी विविध रोजगारनिर्मिती व सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असल्याची माहिती संस्थेचे परभणी जिल्हा समन्वयक श्री. निशिकांत पाटील यांनी दिली.
महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी व समाजहितासाठी शुभंकरोती फाउंडेशनमार्फत सुरू असलेले हे निस्वार्थ व प्रेरणादायी कार्य पाहून उपस्थित अधिकाऱ्यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करत पुढील उपक्रमांसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

Check Also

ओंकार वृद्धाश्रमात किराणा साहित्याचे वाटप करून महिला दिन साजरा

पाथरी प्रतिनिधी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत सामाजिक बांधिलकी जपत एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. …