04/02/26
Breaking News

माँ साहेब जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त 68 दात्यांचे रक्तदानातून अभिवादन

 

शेख वाजीद
जिंतूर,दि 21 ः
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व क्रांतिसूर्य सावित्रीबाई फुले यांच्या जन्मोत्सवा निमित्त छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्ट व सकल मराठा समाज व पुरोगामी महाराष्ट्र यांच्या वतीने बुधवार दिनांक 21 जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरात 68 रक्तदात्यांनी रक्तदान करून मातृत्वाला अभिवादन केले.

भारत देशाला दोन छत्रपती देणाऱ्या माँ साहेब जिजाऊ व सर्वसामान्य माणसाला शिक्षणाचे दार उघडे करून बहुजन समाजाला मुख्यप्रवाहात आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या क्रांतिसूर्य सावित्रीबाई फुले यांची जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असते याचेच औचित्य साधून जिंतूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्ट, सकल मराठा समाज,पुरोगामी महाराष्ट्र यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमास अध्यक्षा म्हणून डॉ सविता वाघमारे या होत्या तर उदघाटन म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागेश लखमावार हे होते प्रमुख पाहुणे वैद्यकीय अधीक्षक डॉ संजय मस्के,तालुका आरोग्य अधिकारी आबासाहेब जाधव,डॉ गीतांजली कान्हडकर,डॉ दीपा परिहार, आशाताई खिल्लारे,सुनीता शिंदे,नमिता सोळंके,मीरा देशमुख,प्रियंका काजळे,नमिता सोळंके,श्रद्धा काकडे,यांची प्रमुख उपस्थितीती होती यावेळी तब्बल 68 रक्तदात्यांनी रक्तदान करून अभिवादन केले विशेष या शिबिरात महिलांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला होता रक्तदान शिबिरासाठी छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काजळे,सचिव बालाजी शिंदे सोसकर यांच्यासह शरद ठोंबरे,ऋषिकेश शिंदे,अनिल गाडेकर,अभिजित देशमुख,संतोष शिंदे,रंजित मस्के,दामू नवले,सोपान धापसे,यांनी परिश्रम घेतले रक्ताचे संकलन परभणी येथील जिल्हा रुग्णालयाच्या ब्लड बँकेचे डॉ गजानन कोंडावर,आकाश बगाटे,विठ्ठल शिंदे,अनिल सावंत,प्रतीक भराडे,मोहम्मद एजाज,विनोद राठोड,संजय वाघमारे,शुभम अंभोरे,सय्यद सलीम व इतर कर्मचाऱ्यांनी रक्त संकलन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल चव्हाण यांनी केले तर आभार गणेश देशमुख यांनी मानले

….
राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती असल्यामुळे मातृत्वाला प्राधान्य देत महिलांच्या हस्ते उदघाटन कार्यक्रम पार पडला विशेष म्हणजे यावेळी तब्बल 22 महिलांनी रक्तदान करुन मातृत्वाला अभिवादन केले.

 

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …