04/02/26
Breaking News

मराठवाड्याचा “वर्ल्डकप “ओळख असलेल्या “नितीन चषक” क्रिकेट स्पर्धेचे शानदार उदघाटन

ओम चैतन्य प पु श्री रामेश्र्वरजी महाराज यांची उपस्थिती

सेलू / प्रतिनिधी – शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त येथील नितीन कला ,क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने आयोजित “नितीन चषक ” क्रिकेट स्पर्धेचा शानदार उदघाटन सोहळा आज मोट्या थाटात संपन्न झाला

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू करण्यात आलेल्या या स्पर्धाचे हे २६ वे वर्ष आहे .
मराठवाड्याचा वर्ल्डकप म्हणून ओळख निर्माण झालेल्या नितीन चषक स्पर्धेचे उदघाटन ओम चैतन्य प पू श्री रामेश्र्वरजी महाराज यांच्या शुभ हस्ते करण्यात आले .

यावेळी शिवसेना उपनेते तथा परभणी जिल्हा संपर्क प्रमुख आनंदजी जाधव ,स्पर्धेचे आयोजक नितीन कला ,क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार हरिभाऊ काका लहाने ,साईबाबा बँकेचे संस्थापक अध्यक्ष हेमंतराव आडळकर ,धैर्यशील कापसे तसेच राजकीय , सामाजिक ,व्यापारी तसेच शहरातील प्रतिष्ठित मंडळी यांची उपस्थिती होती .
ग्रामीण भागातील खेळाडूंना आपल्यातील क्रीडा गुणांना हे एक मोठे व्यासपीठ असून परिसरातील क्रीडा रसिकांना या स्पर्धा म्हणजे एक पर्वणीच असते .त्यासाठी सर्वजण या स्पर्धांची आतुरतेने वाट पहात असतात .अनेक नामवंत क्रिकेट संघांना यामध्ये आमंत्रित केल्या जात असल्यामुळे सर्व सामने एका पेक्षा एक सरस व सतत उत्कंठा वाढवणारेच ठरतात.

या स्पर्धेसाठी परितोषक देखील मोठी असतात .तसेच मालिकावीर व सामनावीर उत्कृष्ट फलंदाज ,उत्कृष्ट गोलंदाज तसेच उकृष्ठ क्षेत्ररक्षण अशी अनेक परितोषक यामध्ये दिली जातात .
अत्यंत खिलाडू वृत्तीने खेळवण्यात येणाऱ्या या स्पर्धा पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींची देखील मोठ्या प्रमाणावर संख्या असते .

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …