04/02/26
Breaking News

अन्नत्याग आंदोलन यशस्वी:प्रहारच्या पदाधिकाऱ्यांचा मटकऱ्हाळा येथे सत्कार

परभणी,दि 22 ः
बच्चुभाऊ कडू यांच्या सोबत शेतकरी कर्जमाफी व इतर १७ मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलनामध्ये सहभागी होऊन स्वतः सात दिवस अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा आज परभणी तालुक्यातील मटकऱ्हाळा येथील शेतकरी व ग्रामस्थांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. यात प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, पाथरी तालुका प्रमुख दीपक खुडे, सोनपेठ तालुका प्रमुख अशोक मस्के पालमचे बालाजी पौळ यांचा सत्कार करण्यात आला.
मा. बच्चुभाऊ कडू यांच्या सोबत शेतकरी कर्जमाफी, दिव्यांगाना सहा हजार रुपये मानधन, पेरणी ते कापणी चा खर्च एमआरईजीएस मधून करावा यासह एकूण १७ मागण्यासाठी “गुरुकुंज” मोझरी, जिल्हा अमरावती येथे दि. ०८ जून २०२५ ते दि. १४ जून २०२५ पर्यंत सतत सात दिवस अन्नत्याग आंदोलन करून राज्य सरकारकडे मागण्या मान्य करून घेण्याचे यशस्वी आंदोलन करून परभणी जिल्ह्यातील शेतकरी दिव्यांग शेतमजूर व निराधारांचा आवाज सरकार दरबारी अन्नत्याग आंदोलनाच्या माध्यमातून यशस्वीरित्या मांडल्या बद्दल हा सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी मटकऱ्हाळा येथील शेतकरी, दिव्यांग व ग्रामस्थांनी मा. बच्चुभाऊ कडू यांचे व अन्नत्याग आंदोलनामध्ये सहभागी होणाऱ्या परभणी जिल्ह्यातील प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाप्रमुख उद्धव गरुड यांनी केले तर आभार प्रदर्शन माजी सरपंच भागवतराव पाटील गरुड यांनी केले. कार्यक्रमाला शाहूराव गरुड, जगन्नाथराव गरुड, भगवानराव गरुड, विलासराव गरुड, हेमराज गरुड, सुरेशराव चेअरमन, वसंतराव गरुड, माणिक गरुड , बबनराव गरुड , संदीप राऊत, प्रताप राऊत, जगन्नाथ गरुड, पृथ्वीराज गरुड, मुंजाजीराव गरुड, गजानन गरुड, रामभाऊ गुरुड, दासा गरुड, ज्ञानोबा गरुड, सुभाष भाऊ गरुड, उत्तमराव गरुड, मुंजाजीराव मुकदम , ज्ञानोबा जाधव, तुकाराम गरुड, प्रताप गरुड, हनुमान गरुड, स्वप्निल सोंने, कोंडीबा सूर्यवंशी, शालिक येडे, गंगारामजी राऊत, राजकुमार राऊत, गंगारामजी लिजडे, नारायण लिजडे ,शेषराव लिजडे, नागू बहिरे, सतीश हरकळ, रमेश हरकळ, उद्धवराव गरुड, विनायक गरुड, प्रभू गरुड, राम गरुड, वैभव गरुड, राजू गरुड इत्यादी शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …