पाथरी प्रतिनिधी
जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती संगीता चव्हाण यांच्या हस्ते केंद्राध्यक्ष,इतर मतदान अधिकारी, वाहक यांचा सत्कार करून हिरवा झेंडा दाखऊन बूथ मतदान केंद्रावर रवाना करण्यात आले.प्रत्येक मतदान केंद्रावर नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी राहण्याची व भोजनाची व्यवस्था स्थानिक पातळीवर करण्यात आलेली आहे.पोलिस निरीक्षक श्री लक्ष्मण केंद्रे यांनी उत्तम नियोजन करून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक तो पोलिस बंदोबस्त ठेवला आहे ज्या ठिकाणी संवेदनशील बाब जाणवेल त्या ठिकाणी जास्तीच्या पोलिस कुमक चेही नियोजन करण्यात आलेले आहे.एकंदरीत निवडणूक शांततेत पार पाडली जाईल यासाठी निवडणूक विभाग मेहनत घेत आहे.यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्री शंकर एन हांदेशवार,गटविकास अधिकारी श्री शैलेश वाव्हळे, गट शिक्षण अधिकारी श्री मुकेश राठोड,नायब तहसीलदार श्री हेमंत सुजलेगावकर,वाहतूक कक्षाचे श्रीमती आसमा बेगम, मुक्तार डांगे,श्रीमती शुभांगी जाधव,सहायक महसूल अधिकारी श्री मकरंद दलाल,मिडिया नोडल अधिकारी श्री संदीपान घुंबरे इत्यादी उपस्थित होते.
Shabdraj www.shabdraj.com