04/02/26
Breaking News

श्री शिवाजी विधी महाविद्यालयात योग शिबिराचे आयोजन

परभणी – भारत सरकारने ’एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग‘ या शीर्षकांतर्गत आंतरराष्ट्रीय योग दिवस २०२५ साजरा करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री शिवाजी विधी महाविद्यालय परभणी येथे शनिवार २१ जून रोजी जागतिक योग दिनानिमित्त महाविद्यालयाच्या गुणवत्ता व हमी कक्ष आणि क्रीडा विभागच्या वतीने योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

 

सर्वप्रथम शिबिराची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.एल.धर्मापुरीकर यांनी योग शिबिराचे मार्गदर्शक श्री. पांडुरंग शिंदे व शेख शमशोद्दीन यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यानंतर योग शिबिरास सुरुवात करण्यात आली. योग शिबिरात मार्गदर्शकांनी विविध आसनांची सर्वांगीण माहिती देऊन मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी योगाचे महत्त्व सांगत वेगवेगळ्या आसनांचे प्रात्यक्षिके दाखवून उपस्थित सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू व भगिनी आणि विद्यार्थ्यांना सुद्धा शिकवली.

 

प्रस्तुत शिबिराच्या समारोपप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी जागतिक योगदिन म्हणजे प्राचीन भारतीय परंपरेचा जागतिक उत्सव, योग:आरोग्याचा मूलमंत्र, जीवनशैलीत सकारात्मक बदल या विषयावर भाष्य केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.डॉ.एच.डब्ल्यू. सूर्यवंशी यांनी केले.शिबिराची सांगता प्रार्थनेने व राष्ट्रगीताने करण्यात आली. शिबिरास महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. शिबिराच्या यशस्वी आयोजना करिता महाविद्यालय विकास समितीचे सन्माननीय सदस्य मा. श्री चंद्रशेखर नखाते, मा. श्री. गोविंद कदम, मा. श्री मकदुम मोहिउद्दिन, मा. श्री. संतोष बोबडे, मा. ॲड. दिपक देशमुख, मा. ॲड. अशोक शिंदे व मा. श्री. संतोष इंगळे आदींनी शुभेच्छा दिल्या.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …