23/08/26
Breaking News

जिल्हास्तरीय तीसऱ्या अक्षर बाल साहित्य संमेलनासाठी के बा च्या विद्यार्थिनींची निवड

आराध्या कटारे व दाक्षायनी इघवे यांची स्वरचित काव्य वाचन तर अंकिता फड हिची कथाकथन साठी निवड

सेलू / प्रतिनिधी – येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयातील इयत्ता सहावी अ च्या ६ विद्यार्थिनींची परभणी जिल्हास्तरीय तीसरे अक्षर आनंद बाल साहित्य संमेलनासाठी निवड झाली आहे. दि. १५ जुन २०२५ ते दि.३ जानेवारी २०२६ दरम्यान राबवण्यात आलेल्या अक्षर आनंद बाल वाचक पुस्तक वाचन मोहिमे अंतर्गत अक्षर आनंद चे प्रमुख विनोद शेंडगे व त्यांच्या टीम ने जिल्ह्यातील निवडक विद्यार्थ्यांची निवड केली आहे.

 

या संमेलनात कथा कथन सत्रात शाळेची इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी अंकिता फड, काव्य वाचन साठी आराध्या कटारे, दाक्षायनी इघवे तर पुस्तकं वाचन अभिप्राय साठी जान्हवी नवघरे,संचिता मुजमुले, संस्कृती शेरे यांची निवड करण्यात आली आहे.दि १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ हे संमेलन परभणी येथे मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे रंगणार आहे

 

यात नाव नोंदणी सकाळी ९ वाजता, वाचन गप्पा सकाळी ९.३० वा,उदघाट्न सत्र सकाळी १० वाजता,कथाकथन सकाळी १०.४५ ते ११.१५,बाल कवी संमेलन ११.१५ ते १२.१५ वा असणार आहे दुपार सत्रात दुपारी १ वा. एकपात्री लघु नाटिका, दुपारी 2 वा. मी वाचलेले पुस्तकं यावर गटचर्चा व दुपारी 3 वा. बालवाचक सन्मान सोहळा व समारोप सत्र असणार आहे.

 

या संमेलनासाठी उदघाटक म्हणून जिल्हा परिषद परभणी च्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिषा माथुर, परभणी अस्ट्रॉनिमिकल सोसायटी चे रामेश्वर नाईक, शिक्षणाधिकारी सुनिल पोलास तर संमेलनध्यक्ष म्हणून कु कोमल डाखोरे, स्वागतध्यक्ष म्हणून कु अनन्या खवले हे असणार आहेत. तसेच समारोप सत्रासाठी अध्यक्ष म्हणून कुलगुरू मा इंद्रमनी, जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, कृषी भूषण कांतराव देशमुख, पक्षी अभ्यासक माणिक पुरी हे मान्यवर असणार आहेत.

 

या विद्यार्थ्यांना योगेश ढवारे यांचे मार्गदर्शन लाभले.निवडीबद्दल शाळेच्या वतीने या विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षक योगेश ढवारे यांचा शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला. या प्रसंगी मुख्याध्यापक संजय धारासुरकर, सिद्धार्थ एडके, ज्येष्ठ शिक्षक दिलीप बेदरकर, अमिता जवळेकर, जयश्री सोन्नेकर आदिची प्रमुख उपस्थिती होती.

 

विद्यार्थ्यांच्या या यशा बद्दल गटशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे, केंद्र प्रमुख एकनाथ जाधव,श्री के बा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष एड अनिरुद्ध जोशी, उपाध्यक्ष डॉ सुनिल कुलकर्णी, सचिव महेश खारकर, मुख्याध्यापक संजय धारासुरकर, सिद्धार्थ एडके आदिनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Check Also

टोलेजंग इमारत सज्ज, तरी वाचक प्रतीक्षेत! हिंगोलीतील नवीन जिल्हा ग्रंथालयाचे उद्घाटन कधी?

​हिंगोली (विशेष प्रतिनिधी): हिंगोली शहरातील महसूल कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभारण्यात आलेली जिल्हा ग्रंथालयाची भव्य आणि …