गंगाखेड / प्रतिनिधी – महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई यांच्या आदेशानुसार गंगाखेड विधानसभा मतदारसंघासाठी ‘बांधकाम कामगार स्थानिक संनियंत्रण समिती’ची अधिकृत स्थापना करण्यात आली आहे.
या समितीच्या अध्यक्षपदी डॉ. रत्नाकर गुट्टे यांची नियुक्ती करण्यात आली असून, सदस्यपदी प्रविण शांतिलाल काबरा यांची निवड करण्यात आली आहे. उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या शासन निर्णयानुसार तसेच दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजीच्या आदेशान्वये समिती गठीत करण्यात आली आहे.
बांधकाम क्षेत्रातील कामगारांचे हक्क संरक्षण, कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी, तसेच स्थानिक पातळीवरील प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी ही समिती कार्यरत राहणार आहे.
समितीची रचना पुढीलप्रमाणे :
अध्यक्ष : आ. डॉ. रत्नाकर माणिकराव गुट्टे
सदस्य (पुरुष बांधकाम कामगार प्रतिनिधी) :
राहुल गंगाधर शिंदे
असदुल्लाखान महमुदखान पठाण
सदस्य (महिला बांधकाम कामगार प्रतिनिधी) :
मंजुषा अण्णासाहेब जामने
सुषमाला शिवराज मोतीपवळे
सदस्य (बांधकाम क्षेत्रातील मालक प्रतिनिधी) :
लक्ष्मण प्रल्हादराव मुंढे
प्रविण शांतिलाल काबरा
सदस्य-सचिव : शासकीय कामगार अधिकारी
समितीच्या माध्यमातून बांधकाम कामगारांची नोंदणी, विविध शासकीय लाभ योजना, आरोग्य व शिक्षण सुविधा, आर्थिक सहाय्य तसेच तक्रार निवारण प्रक्रियेला अधिक गती मिळणार आहे.
आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली ही समिती कामगारांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी सक्रिय व परिणामकारक भूमिका पार पाडेल, असा विश्वास कामगार वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.
Shabdraj www.shabdraj.com