गंगाखेड,दि 16 ः
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण परभणी तथा तालुका विधी सेवा समिती गंगाखेड व जिल्हा प्रशासन परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने (दि.१४ फेब्रुवारी शनिवार) रोजी कापसे गार्डन,गंगाखेड येथे शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा तसेच कायदे विषयक महा शिबिर उत्साहात संपन्न झाले.
या कार्यक्रमास मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबादचे न्यायमूर्ती संदीपकुमार सी.मोरे,न्यायमूर्ती संजय ए.देशमुख (पालक न्यायाधीश,जिल्हा परभणी)यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा उज्वला एम.नंदेश्वर उपस्थित होत्या.कार्यक्रमास जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण,पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी,मुख्य कार्यकारी अधिकारी नितीषा माथुर,जिल्हा न्यायाधीश १ तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती गंगाखेड दिनेश डी.कुरुलकर,सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण परभणी,ॲड.भूषण काळे,तालुका वकील संघ गंगाखेडचे अध्यक्ष ॲड.मिलिंद शिरसागर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
या शिबिरामध्ये संत जनाबाई शिक्षण संस्थेचे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने विविध जनजागृतीपर उपक्रम राबवले. बालविवाह प्रतिबंध,अवयवदान जनजागृती,हर घर तिरंगा अभियान तसेच मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आकर्षक सेल्फी पॉईंट उभारण्यात आला.या महाशिबिरात राष्ट्रीय सेवा योजनेचे सुमारे २०० स्वयंसेवक व स्वयंसेविका सहभागी झाले होते.या उपक्रमाचे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर,तहसीलदार उषाकिरण शृंगारे,तहसीलदार पूर्णा बोथीकर, नायब तहसीलदार शिंदे,सपोनि गीते,नायब तहसीलदार अशोक केंद्रे,संस्थेचे उपाध्यक्ष ॲड.रमेशराव मोहोळकर,सचिव ॲड.संतोषराव मुंडे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एम.धूत यांनी विशेष कौतुक केले.हे शिबिर यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.प्रकाश सुर्वे यांनी परिश्रम घेतले.
Shabdraj www.shabdraj.com