27/07/26
Breaking News

पीएम किसान योजनेचा २२वा हप्ता कधी येणार ?

देशातील कोट्यवधी शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहे. पीएम किसान योजनेचा २२वा हप्ता कधी येणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. पीएम किसान योजनेत आतापर्यंत २१ हप्ते देण्यात आले आहेत. त्यानंतर पुढचा २२वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात येईल, असं सागितलं होतं. मात्र, अजूनही याबाबत घोषणा झालेली नाही.

पीएम किसान योजनेत आतापर्यंत २१ हप्ते देण्यात आले आहेत. २१वा हप्ता नोव्हेंबर २०२५ रोजी देण्यात आला होता. आता फेब्रुवारी महिना संपण्यासाठी अवघे ५ दिवस उरले आहेत तरीही याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही.

पीएम किसानचा हप्ता मिळवण्यासाठी हे काम आताच करा

पीएम किसान योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ईकेवायसी करणे अनिवार्य आहे. केवायसी केल्याशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये जमा होणार नाही. याचसोबत फार्मर आयडीदेखील गरजेचे आहे. आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक नसेल तर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार नाहीत. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ही कामे करायची आहेत.

तुम्हाला पैसे मिळणार की नाही?

सर्वात आधी पीएम किसानच्या pmkisan.gov.in वेबसाइटर जायचे आहे.

यानंतर बेनिफिशियरी स्टेट्सवर क्लिक करायचे आहे.

यानंतर आधार नंबर आणि मोबाईल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे.

यानंतर तुम्हाला तुमच्या मागच्या हप्त्याची माहिती आणि पुढच्या हप्त्याचा स्टेट्‍स कळणार आहे.

Check Also

सावधान भगर खाताय… मग हे वाचाच…!

शनिवार, दि. २५ जुलै २०२६ रोजी देवशयनी आषाढी एकादशी आहे. एकादशीला मोठ्या प्रमाणात भाविक उपवास …