24/03/26
Breaking News

मराठवाड्यातील एक खासदार दुबईत अडकले..संपर्क तुटला

शनिवारी इस्त्रायल आणि अमेरिकेनं इराण देशावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात इराणचा सर्वोच्च नेता आयतुल्ला अली खामेनेई ठार झाला. या घटनेनंतर आता इराण चवथळला आहे. इराणने अनेक आखाती राष्ट्रांवर हल्ला चढवला आहे. संबंधित देशातील अमेरिकेच्या सैनिकी स्थळांना इराणकडून टार्गेट केलं जात आहे. यामुळे संपूर्ण आखाती राष्ट्रांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा परिणाम हवाई वाहतुकीवर झाला असून अनेक भारतीय आखाती राष्ट्रांमधील विविध देशांमध्ये अडकले आहेत.
दरम्यान, आता लोकसभा निवडणुकीत जायंट किलर ठरलेले काँग्रेसचे खासदार कल्याण काळे देखील दुबईत अडकले आहेत. ते कामानिमित्त दुबईला गेले होते. मात्र आता दुबईत अनेक ठिकाणी इराणकडून हल्ला झाल्याने येथील हवाई वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. परिणामी काँग्रेसचे खासदार कल्याण काळे दुबईत अडकले आहेत. त्यांना मायदेशी परत येण्यास अडचणी निर्माण होत आहेत. विशेष म्हणजे त्यांचा कुटुंबीयांसोबतचा संपर्क तुटला आहे.दोन दिवसांपूर्वी कल्याण काळे यांचा कुटुंबीयांशी संपर्क झाला होता. ते सुरक्षित असल्याचं त्यांनी कुटुंबाला सांगितलं होतं. कल्याण काळे यांचे बंधू भाऊसाहेब काळे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी कल्याण काळे चर्चेत आले होते. त्यांनी जालन्यातून पाच टर्म खासदार राहिलेल्या रावसाहेब दानवे सारख्या मातब्बर नेत्याला हरवलं होतं.

Check Also

ओंकार वृद्धाश्रमात किराणा साहित्याचे वाटप करून महिला दिन साजरा

पाथरी प्रतिनिधी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत सामाजिक बांधिलकी जपत एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. …