27/07/26
Breaking News

शुभंकरोती फाउंडेशनला राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

सेलू / प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शुभंकरोती फाउंडेशनच्या उत्कृष्ट सामाजिक कार्याची तसेच महिलावर्गाच्या स्वावलंबितेसाठी घेतलेल्या विविध उपक्रमाची दखल घेऊन राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई येथे संपन्न झाला. यावेळी माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर, आमदार मनीषा कायंदे, मुंबईच्या महापौर रितू तावडे तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी व सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत शुभंकरोती फाउंडेशनचा हा गौरव करण्यात आला.
पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल शुभंकरोती फाऊंडेशन चे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे .

Check Also

सावधान भगर खाताय… मग हे वाचाच…!

शनिवार, दि. २५ जुलै २०२६ रोजी देवशयनी आषाढी एकादशी आहे. एकादशीला मोठ्या प्रमाणात भाविक उपवास …