24/03/26
Breaking News

पूर्णा येथे मंगळवारी महिला बचत गटांचा सन्मान सोहळा

सुशिल दळवी
पूर्ण,दि 09 ः
पूर्णा नगर परिषद, दीनदयाल उप जीविका अभियान (DJAY) आणि स्वाभिमान शहर स्तर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महिला मेळावा’ व महिला बचत गटांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आला असून शहरातील महिला बचत गटांनी व्यवसाय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम मंगळवार, दि. १० मार्च २०२६ रोजी दुपारी १ वाजता सावित्रीबाई ज्योतिराव फुले सभागृह, नगर परिषद पूर्णा येथे होणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष विमलताई लक्ष्मणराव कदम यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पद्मिनीताई नामदेव एंगडे राहणार आहेत. तसेच नगर परिषदेचे सर्व सदस्य प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला मार्गदर्शन मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे करणार आहेत. या कार्यक्रमात शहरातील महिला बचत गटांनी व्यवसायात घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आहे. प्रकल्प अधिकारी मोरे यांनी केले आहे

Check Also

ओंकार वृद्धाश्रमात किराणा साहित्याचे वाटप करून महिला दिन साजरा

पाथरी प्रतिनिधी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत सामाजिक बांधिलकी जपत एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. …