16/10/26
Breaking News

 सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण, २ महिन्यांनंतर सोनं दीड लाखांच्या खाली

मुंबई,दि 22
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे सोनं-चांदी खरेदीची चांगली संधी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनं-चांदीचे दर वाढले होते. त्यामुळे सोनं- चांदी विकत घेणं सध्या सामान्य माणसाच्या आवाक्या बाहेर गेलं होतं. मात्र तो योग आता आला आहे. इराण-इस्राइलमध्ये सुरू असलेल्या युद्धासह आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक घडामोडी घडत असल्यामुळे सोनं आणि चांदीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. जवळपास २ महिन्यांनंतर सोनं दीड लाखांच्या खाली आले आहे. सध्या सोन्याचा भाव १ लाख ४८ हजार ६२९ रुपये तोळा इतका झाला आहे. तर चांदीचा दर २ लाख ३७ हजार ९३० रुपये प्रतिकिलोवर पोहोचला आहे. दरवाढीचे उच्चांक गाठल्यानंतर मार्च महिन्यात गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Check Also

CBSE च्या 2027 परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक पाहा, कधी असू शकते परीक्षा ?

सीबीएसई दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना विषयानुसार परीक्षेच्या तारखा, …