27/04/26
Breaking News

कपड्यांच्या बटणांना फक्त चारच छिद्रे का ? कारण..

दैनंदिन जीवनात आपण रोज वेगवेगळ्या पद्धतीचे कपडे घालतो. पण अनेक लहानसहान गोष्टींकडे आपले लक्ष जात नाही. त्यापैकीच एक म्हणजे बटण. तुमच्या लक्षात आले असेल की बहुतेक शर्ट आणि कपड्यांच्या बटणांना चार लहान छिद्रे असतात. पण बहुतेक कपड्यांच्या बटणांना फक्त चारच छिद्रे का असतात, असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का ? कारण, 4 ऐवजी 2-3 किंवा थोडी जास्तही छिद्रंही असू शकली असती ना

जर हे तुमच्या कधी लक्षात आले नसेल, तर आज आपण त्यामागचं कारण जाणून घेऊया. कपड्यांच्या बटणांना चार छिद्रं किंवा चार भोकं असण्यामागे एक खूपच रंजक कारण आहे.

खरंतर बटणामध्ये ही जी 4 छिद्र असतात, ती यासाठी असतात की, सुरक्षितपणे दोरा ओवला जावा. जेव्हा दोरा या चार छिद्रांमधून जातो, तेव्हा बटण कापडाला घट्ट बसते आणि सहजपणे तुटत नाही किंवा सैल होत नाही.

जर बटणाला फक्त दोन छिद्रं असती, तर ते सैल होऊन तुटण्याची शक्यता जास्त असती. म्हणजेच चार छिद्रांच्या रचनेमुळे बटण अधिक मजबूत होतं.

चार छिद्रे असल्यामुळे शिंप्यालाही बटण शिवणं सोपं जातं. तो धागे क्रॉस करून किंवा समांतर ओवू शकतो, ज्यामुळे बटण कापडाला अधिक घट्ट बसण्यास मदत होते.

तसंच चार छिद्रांची बटणे अधिक चांगली दिसतात. कपड्यांच्या डिझायनर्सना अनेकदा असं वाटतं की बटणे केवळ कामासाठी नसावीत, तर त्यामुळे कपड्यांचं सौंदर्यही वाढावं.

पण प्रत्येक बटणाला चार छिद्रं असावीत असं नाही. काही बटणांना दोन छिद्रे असतात आणि बऱ्याच बटणांच्या मागे एक लहान दांडा असतो, तरीही चार छिद्रांची बटणे ही सामान्यतः शर्ट आणि रोजच्या कपड्यांसाठी वापरली जातात.

Check Also

नवीन शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून,दोन मे पासून सुट्या

: यंदा राज्यातील सर्व शाळांना २ मेपासून उन्हाळी सुटी जाहीर करण्यात येणार आहे. नवीन शैक्षणिक वर्ष …