पाथरी,दि 05 (प्रतिनिधी)ः
पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ मानवत संचलित कै.स.गो.नखाते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देवनांद्रा येथील पर्यवेक्षक एन .बी .तायनाक यांना संस्थेमध्ये सेवेला ३० वर्ष दोन महिने पुर्ण झाल्याने दि. ३० मार्च रोजी ते सेवानिवृत्त झाले. त्या निमित्ताने संस्थेच्या वतीने
त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
संस्थेमध्ये 01फेब्रुवारी 1996 रोजी संस्थापक अध्यक्ष कै.स.गो.नखाते यांच्या व ईतर संचालक समोर प्रत्यक्ष मुलाखत देऊन नियुक्ती करण्यात आली होती , त्यांनी संस्थेच्या मानवत येथील श्रीमती शकुंतलाबाई कांचनराव कत्रुवार विद्यालय येथे व नंतर पाथरी येथील कै. स.गो. नखाते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देवनांद्रा येथे विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याच्या कार्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या बौद्धिक ,आत्मिक, शारीरिक, सांस्कृतिक, मानसिक , शिस्त, सर्वांगीण विकास ,करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली, शालेय परिसरातील वृक्षांची ,वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे या उक्तीप्रमाणे सर्व वृक्षाचे संगोपन केले आजच्या परिस्थितीमध्ये सर्व परिसर हिरवा असणे याचे श्रेय तायनाक यानांच जाते. जून 2023 रोजी त्यांची उत्कृष्ट दूरदृष्टी लक्षात घेऊन संस्थेने पर्यवेक्षक पदी नियुक्ती केले, या काळामध्ये शाळेच्या सर्व कामकाजामध्ये व शालेय व्यवस्थापनामध्ये चांगली दृष्टी ठेवून सरांनी कार्य केले व 31 मार्च 2026 रोजी सरांना नियत वयोमानानुसार 31 वर्ष दोन महिने पूर्ण होऊन सेवा निवृत्ती देण्यात आली त्यानिमित्त संस्थेच्या वतीने सेवा गौरव समारंभ घेऊन संस्थेचे उपाध्यक्ष अनिल नखाते व संचालक दिलीपराव हीबारे,संचालक संजय बांगड यांच्या हस्ते तायनाक नामदेव व सौ .अन्नपूर्णाताई तायनाक यांचा शाल पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य अजिंक्य नखाते,दादासाहेब टेंगसे माजी शिक्षण सभापती जि प परभणी, माधवराव जोगदंड माजी सभापती कृ.उ.बा.समिती पाथरी, प्रस्तुत विद्यालयाचे मुख्याध्यापक .होगे. बी .आर. संस्थेतील सर्व कर्मचारी, सरांचे गावाकडील आप्तस्वकीय ,पाहुणे ,मित्र ,माजी विद्यार्थी व शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
Shabdraj www.shabdraj.com