हिंगोली,ता 07
सध्या लग्नसराईचा मोसम सुरू असून अनेक जण सुरक्षिततेच्या कारणास्तव बँक लॉकर मध्ये ठेवलेले दाग दागिने काढून आणतात व लग्न सोहळा संपल्यानंतर सुद्धा लगेच लॉकरमध्ये न ठेवता घरातील कपाटात सुरक्षित म्हणून ठेवतात परंतु हीच चूक नडते व घरात जेव्हा चोरी होते तेव्हा चोरट्याचे पहिले टार्गेट हे कपाट असते व सर्व दागिने लंपास होतात त्यामुळे आपण लाॅकर मधून काढून आणलेले दागिने किंवा घरातील इतर दागिने कपाटात न ठेवता इतरत्र ठेवावे व काम झाल्यानंतर तात्काळ परत लॉकरमध्ये जमा करावे. असे आवाहन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांनी केले आहे.
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये बाहेरगावी किंवा फिरायला जाताना तसेच मूळ गावी जाताना शेजाऱ्यांना घर बंद असल्याची कल्पना द्यावी तसेच शक्यतो आतल्या बाजूने कुलूप लावावे, घरातील लाईट चालू ठेवावे, चोरट्यांना रस्त्यावरून जाताना घर बंद आहे किंवा घराला समोरून कुलूप लावले आहे अशा प्रकारचे निदर्शनास येऊ नये.
तसेच गल्लीत शक्यतो अनेक जणांनी मिळून सीसीटीव्ही लावावी स्थानिक वाचमन वगैरे सुद्धा शक्य असल्यास ठेवावे. सराफा लाईन, बँक अधिकारी यांनी सुद्धा वाचमन यांना सतर्क करावे योग्य त्या सूचना द्याव्या व कोणत्या क्षणी हिंगोली पोलीस टोल फ्री क्रमांक 112 वर संपर्क करावा.
उन्हाळ्यामध्ये चोरीचे प्रमाण हे नेहमी वाढत असते लोक घरात न झोपता बाहेर उघड्यावर झोपत असतात त्यामुळे चोरट्यांनी उघड्यावर झोपलेल्या महिलांचे दाग दागिने चोरून नेणे तसेच घरात कोणीही नसल्यामुळे घरातील कपाट घरात प्रवेश करून चोरी करणे असे प्रकार घडत असतात त्यामुळे सर्व नागरिकांनी चोरी न होण्यासाठी व झालीच तरी मौल्यवान वस्तू न मिळण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
………………………
उन्हाळ्यामध्ये होणारे मालाविरुद्धचे गुन्हे रोखण्यासाठी हिंगोली पोलीस दलातर्फे दैनंदिन नाकाबंदी, पोलीस स्टेशन स्तरावरील पेट्रोलिंग तसेच स्थानिक गुन्हे शाखेची विशेष पेट्रोलिंग ठेवण्यात आली आहे, तरीसुद्धा नागरिकांनी खबरदारी घेऊन मौल्यवान वस्तू कपाटात ठेवू नये तसेच कपाटामध्ये सोन्यासारखे दिसणारे वस्तू ठेवल्यास चोरटे इतरत्र शोध घेणार नाहीत .
– मोहन भोसले पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली
Shabdraj www.shabdraj.com