12/06/26
Breaking News

 पंचायत समिती वसमत येथे ‘आरोग्य संपन्न गाव कृती दल’ समितीची बैठक संपन्न

हिंगोली,ता 10 
ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आणि गावागावांमध्ये आरोग्याचा दर्जा उंचावण्यासाठी  बुधवारी (ता.10)   पंचायत समिती वसमत येथे   ‘तालुका आरोग्य संपन्न गाव कृती दल समिती’ची बैठक घेण्यात आली. सदर बैठक गटविकास अधिकारी  प्रफुल्ल तोटेवाड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.
​या बैठकीला वसमत येथील  वैद्यकीय अधीक्षक डॉ. गंगाधर काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप काळे यांच्यासह तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक व समितीचे इतर सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.​
​बैठकीदरम्यान गटविकास अधिकारी प्रफुल्ल तोटेवाड यांनी  “माझं गाव आरोग्य संपन्न गाव” या महत्त्वाकांक्षी अभियानाची रूपरेषा उपस्थितांसमोर मांडली. अभियानांतर्गत निश्चित करण्यात आलेल्या ५९ इंडिकेटर (निकष) निहाय त्यांनी विस्तृत माहिती दिली. गावातील १००% लसीकरण, संस्थात्मक प्रसूती, शुद्ध पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, स्वच्छता, कुपोषण मुक्ती आणि संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण यांसारख्या घटकांवर त्यांनी विशेष भर दिला.

​…………..
​”कोणतेही अभियान यशस्वी करण्यासाठी केवळ एका विभागाचे प्रयत्न पुरेसे नसतात. ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ हे अभियान यशस्वी करण्यासाठी या सर्वच यंत्रणांनी आपापसातील समन्वय वाढवून एकत्रितपणे  काम करणे गरजेचे आहे
प्रफुल्ल तोटेवाड,गटविकास अधिकारी वसमत

Check Also

खडकपुरा गल्लीत गोदामावर धाड,92 हजार 248 रुपयांचा मुद्देमाल जप्त

गंगाखेड,दि 12  गंगाखेड शहरातील खडकपुरा गल्लीत दि १० जुनच्या मध्यरात्री अवैध गुटखा साठ्यावर स्थानिक गुन्हे …