16/06/26
Breaking News

गुणापेक्षा गुणवत्तेला महत्त्व द्यावे- महेश पाटील

गंगाखेड (प्रतिनिधी) — आपल्या पाल्याचे करिअर घडवताना केवळ मार्कशीटकडे लक्ष न देता विद्यार्थ्यांच्या नैसर्गिक गुणवत्तेला प्राधान्य द्यावे. गुणवत्तेवर भर दिल्यास यशाचा मार्ग अधिक सुलभ होतो, असे प्रतिपादन शिक्षणतज्ञ  महेश पाटील यांनी केले.

परशुराम सेवा समिती व सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने गंगाखेड येथील भगवान परशुराम चौकातील गीता मंडळ सभागृहात तालुक्यातील इयत्ता दहावी, बारावी तसेच विविध क्षेत्रांत प्रावीण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थी व गुणवान व्यक्तींचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प. बाळू महाराज नाव्हेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून अभय हट्टेकर, नागेश पैठणकर, दिनकर नाव्हेकर, प्राचार्या सौ. सीमा राखे, सौ. गीतांजली मंगळुरकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. पाटील म्हणाले की, केवळ वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रापुरतेच करिअर मर्यादित नसून दहावी-बारावीनंतर विद्यार्थ्यांसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण विचार करून आपल्या आवडी-क्षमतेनुसार क्षेत्र निवडावे. पालकांनीही मोबाईल व टीव्हीच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा. घरातील टीव्ही सायंकाळी सात ते नऊ या वेळेत बंद ठेवावेत आणि रात्री दहाच्या नंतर मोबाईलचा वापर टाळून मुलांमध्ये योग्य संस्कार रुजवावेत, असे आवाहन त्यांनी केले.
समाजातील विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शनासह कोणतीही शैक्षणिक अडचण आल्यास स्वतः मदत करण्याची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच गरीब व होतकरू विद्यार्थ्यांच्या पाठीशी समाजाने खंबीरपणे उभे राहावे, असेही त्यांनी नमूद केले.
मार्गदर्शनानंतर सर्व गुणवंतांचा त्यांच्या पालकांसह शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परशुराम सेवा समितीचे अतुल तुपकर, बाळासाहेब राखे, रमेश औसेकर, भैया जोशी, नागेश कोनार्डे, श्रीपाद दलाल, पंकज कुलकर्णी, नागेश बोरीकर, अमोल वझुरकर, पियुष पाठक, सुहास पाठक, राम कासंडे, गजानन कुलकर्णी, अमोल दिवाण व मनोज नाव्हेकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Check Also

 ‘वनामकृवि’ व ‘मा.बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्र’ यांच्यात सामंजस्य करार!

हिंगोली: मराठवाडा व राज्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि हळद प्रक्रियेला जागतिक स्तरावर नेण्यासाठी एक …