16/06/26
Breaking News

पान टपरी चालकांमध्ये प्रचंड घबराट,पान टपऱ्या पटापट बंद

 प्रशासकीय वर्तुळात आपल्या कडक आणि शिस्तप्रिय कारभारासाठी ओळखले जाणारे अन्न आणि औषध प्रशासन (आयुक्त तुकाराम मुंढे आज नांदेड दौऱ्यावर आल्याची एकच अफवा शहरात पसरली. या एकाच अफवेने शहरातील पान टपरी चालकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आणि कारवाईच्या भीतीपोटी दुपारनंतर शहरातील मुख्य भागातील पान टपऱ्या पटापट बंद झाल्या. अनेक टपरी चालक तर टपऱ्या कुलूपबंद करून थेट पसार झाले.
तुकाराम मुंढे यांनी अन्न आणि औषध प्रशासन (FDA) आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यापासून राज्यातील अवैध अन्नपदार्थ, भेसळ आणि विशेषतः प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर धडक कारवायांचा सपाटा लावला आहे. अनेक शहरांमध्ये कोट्यवधी रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला असून  मोठे साठेबाज आणि किरकोळ विक्रेते यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंढे यांच्या या धडक मोहिमेची धास्ती संपूर्ण राज्यातील पान टपरी चालकांनी घेतली आहे.आज अचानक दुपारच्या सुमारास तुकाराम मुंढे स्वतः नांदेड दौऱ्यावर आले असून ते शहरात वेगवेगळ्या ठिकाणी अचानक छापे टाकणार आहेत, अशी जोरदार अफवा सोशल मीडिया आणि स्थानिक वर्तुळात पसरली. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच नांदेड शहरातील वजीराबाद, स्टेशन रोड, आयटीआय कॉर्नर, शिवाजीनगर, श्रीनगर यांसारख्या मुख्य आणि गजबजलेल्या भागातील पान टपऱ्यांचे शटर पटापट खाली झाले. एरवी ग्राहकांची गर्दी असणाऱ्या या टपऱ्यांवर अचानक शांतता पसरली.

Check Also

अवैध रेती वाहतूकीचे टिप्पर जप्त, चालकासह मालकावर गुन्हा

पुर्णा, ता. १५ (प्रतिनिधी) पुर्णा तालुक्यातील धनगर टाकळी शिवारातील गोदावरी नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध रेती …