17/10/26
Breaking News

पक्ष सोडूनही सचिन अहिर एकदम सेफ!:अपात्रतेची कारवाई होणार नाही

ठाकरे कुटुंबाचे अत्यंत विश्वासून आणि निष्ठावान नेते मानले जाणारे सचिन अहिर यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर सचिन अहिर यांना थेट विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी विराजमान केले जाणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. एकीकडे ठाकरे गटाने या बंडखोरीवर संताप व्यक्त करत अहिर यांच्यावर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. मात्र, कायदेतज्ज्ञांच्या मते सचिन अहिर यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई करणे जवळपास अशक्य आहे.

शिंदे गटात जाऊनही सचिन अहिर यांनी “मी पक्ष सोडलेलाच नाही,” असे खळबळजनक विधान केले आहे. त्यांच्या या विधानाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भक्कम कायदेशीर आधार देत समर्थन दिले आहे. शिंदे यांनी स्पष्ट केले की, “सचिन अहिर २०२२ मध्ये जेव्हा विधानपरिषदेवर निवडून गेले, तेव्हा त्यांना आमच्याच आमदारांनी मतदान केले होते. ते अधिकृत शिवसेनेकडून आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हावरच विजयी झाले होते. आजघडीला निवडणूक आयोगाच्या निकालानुसार शिवसेना हा मूळ पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह आमच्याकडेच आहे. त्यामुळे अहिर मूळ पक्षातच असल्याने त्यांच्या अपात्रतेचा प्रश्नच उद्भवत नाही.”

पक्षांतर बंदी कायद्यातून सचिन अहिर कसे बचावणार?

ॲड. असीम सरोदे यांनी यामागील कायदेशीर पेच आणि अहिर यांना मिळणारे संरक्षण सविस्तरपणे स्पष्ट केले आहे. सचिन अहिर यांना विधानपरिषदेचे उपसभापतीपद दिले जाणार आहे, आणि हीच बाब त्यांना कायदेशीरदृष्ट्या सर्वात मोठे संरक्षण देणारी ठरणार आहे. ॲड. असीम सरोदे यांच्या मते, सचिन अहिर हे उपसभापतीपदी विराजमान झाल्यास त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत अपात्रतेची कारवाई होऊच शकत नाही.

Check Also

राहुल गांधी विद्यार्थ्यांसाठी मैदानात, सरकारकडे ३ मागण्या

नवी दिल्ली : विद्यार्थी शांततापूर्वक मार्गाने आंदोलन करीत आहेत. एकेकाळी भारतातील शिक्षण संस्थेचा जगात गवगवा होता, …