16/10/26
Breaking News

सोन्याच्या दरात घसरण,चांदीच्या किमतीत…..

सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज, 15 सप्टेंबर रोजी देशातील सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे, तर चांदीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. सोन्याचा भाव  500 रुपयांनी कमी होऊन 1,55,400 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. दुसरीकडे, चांदीचा दर 2,34,600 रुपये प्रति किलोग्रॅमवर स्थिर आहे. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी चांदीच्या दरात घट न झाल्याने ग्राहकांना चांदी स्वस्त होण्याची प्रतीक्षा कायम आहे.

 सोन्याच्या दरात 500 रुपयांची घसरण

आज सराफा बाजारात 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याच्या किमतीत (Gold Price) 500 रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे सोन्याचा दर 1,55,400 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. मागील सत्रात म्हणजेच 14 सप्टेंबर रोजी हेच सोने 1,55,900 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. त्याच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात 500 रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांत सोन्याच्या किमतीत मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरच्या किमतीतील बदल, कच्च्या तेलाचे दर आणि जागतिक आर्थिक परिस्थिती यांचा सोन्याच्या भावावर परिणाम होत असतो. आजच्या घसरणीमागे जागतिक बाजारातील विक्रीचा दबावहे एक प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे.

चांदीच्या दरात कोणताही बदल नाही

सोन्याच्या किमतीत घट झाली असली, तरी चांदीच्या दरात  आज कोणताही बदल झालेला नाही. देशभरात चांदीचा भाव 2,34,600 रुपये प्रति किलोग्रॅमवर स्थिर आहे. त्यामुळे चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आज ना फायदा मिळाला आहे, ना दरवाढीचा अतिरिक्त फटका बसला आहे. सणासुदीचा काळ आणि लग्नसराईचा हंगाम लक्षात घेता सोने-चांदीच्या दराकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे. दिवाळीच्या काळात चांदीची नाणी, दागिने आणि चांदीची भांडी खरेदी करण्याची परंपरा आहे. त्यामुळे चांदीच्या किमतीत भविष्यात काय बदल होतात, हे ग्राहकांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

Check Also

CBSE च्या 2027 परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक पाहा, कधी असू शकते परीक्षा ?

सीबीएसई दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना विषयानुसार परीक्षेच्या तारखा, …