16/10/26
Breaking News

एल निनोचे संकट…थंडीत असणार उन्हाळा

आगामी काळात भारतावर ‘सुपर’ एल निनोचे संकट घोंगावण्याची शक्यता असून त्याच्या संभाव्य परिणामांना सामोरे जाण्यासाठी शास्त्रज्ञ आणि धोरणकर्त्यांनी तातडीने तयारी करावी, असे आवाहन देशातील 188 शास्त्रज्ञ आणि पर्यावरण अभ्यासकांनी केले आहे.

एल निनोमुळे पावसावर परिणाम होण्याबरोबरच उष्णता, दुष्काळ, जंगलातील आगी आणि प्रवाळभित्तींच्या ऱ्हासासारख्या पर्यावरणीय संकटांची तीव्रता वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आगामी एल निनोच्या परिणामांचे शास्त्रीय पद्धतीने दस्ताऐवजीकरण करण्याची गरज नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आवाहनात अधोरेखित करण्यात आली आहे.

एल निनोची निर्मिती ज्या प्रशांत महासागरात होते, तेथील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान 0.5 अंश सेल्सिअसच्या निर्धारित मयदिपेक्षा वाढले असून, ऑगस्ट 2026 मध्ये ते 2.6 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. आगामी काळात ही वाढ चार अंशांनी होण्याची शक्यता आहे. यामुळे जंगलांमध्ये आगी वाढण्याबरोबरच मोठ्या आकाराच्या वृक्षांवरही दुष्काळ आणि उष्णतेचा विपरीत परिणाम होऊ शकतो.

पश्चिम घाटातील अनेक मोठी झाडे आधीच त्यांच्या उष्णता सहन करण्याच्या मयदिच्या जवळ असल्याचे शास्त्रज्ञांनी नमूद केले आहे. शहरांमध्ये ‘हिट आयलंड’ परिणामामुळे झाडे आणि वनस्पतींवर उष्णतेचा ताण वाढण्याची शक्यता आहे. एल निनोमुळे दुष्काळ व तीव्र उष्णतेची शक्यता वाढल्यास त्याचा परिणाम शेतकरी, मच्छीमार व मेंढपाळांच्या उपजीविकेवर होऊ शकतो.

ऑगस्ट महिना आत्तापर्यंतचा विक्रमी उष्ण

ऑगस्ट 2026 हा पृथ्वीवर आतापर्यंतचा ‘सर्वांत उष्ण’ ऑगस्ट ठरला आहे. जागतिक हवामान संघटनेने विविध हवामान संस्थांच्या आकडेवारीच्या आधारे ही माहिती दिली आहे. याच काळात उत्तर गोलार्धाने आतापर्यंतचा सर्वाधिक उष्ण उन्हाळा अनुभवला, तर दक्षिण गोलार्धातील हिवाळाही विक्रमी उष्णतेच्या जवळ पोहोचला.

हिवाळाही उष्ण असणार

2026-27 मधील तीव्र ‘सुपर एल निनो’ (Super El Niño) च्या प्रभावामुळे यंदाचा येणारा हिवाळा सामान्यपेक्षा अधिक उष्ण, कोरडा आणि कमी थंडीचा राहण्याची दाट शक्यता आहे. नोव्हेंबर 2026 पासून पुढचे काही महिने भारताच्या अनेक भागांत हवामान सामान्यपेक्षा जास्त उष्ण आणि कोरडे राहू शकते. पावसाळ्यातील अनियमिततेनंतर एल निनोमुळे जमिनीतील ओलावा आधीच कमी झाला आहे, ज्यामुळे हिवाळ्याच्या काळात कोरडेपणा अधिक वाढेल. पावसाअभावी भूजल पातळीवर परिणाम होईल आणि पुढील वर्षीचा उन्हाळा अधिक तीव्र राहण्याची शक्यता आहे.

Check Also

CBSE च्या 2027 परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक पाहा, कधी असू शकते परीक्षा ?

सीबीएसई दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना विषयानुसार परीक्षेच्या तारखा, …