16/10/26
Breaking News

पाऊस आला धावुन गेट न बसवल्यामुळे पाणी गेले वाहून…..

हिंगोली,दि 03
हिंगोली जिल्ह्यांमध्ये शासनाच्या वतीने जिल्ह्यात सन 2023, 2024, 25 या वर्षांमध्ये मध्ये अनेक ठिकाणी बंधारे बांधण्यात आले .परंतु या बंधार्‍यावर गेट न बसवल्याने मुळे पावसाचे पडलेले पूर्ण पाणी वाहून गेले आहे. हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी शासनाकडून बंधारे बांधण्यासाठी करोडो रुपयांच्या निधी आला असतानाही ज्या ज्या ठिकाणी बंधारे बांधलेत परंतु त्या ठिकाणी त्या बंधार्‍यावर हिंगोली जिल्ह्यात कुठेच बंधाऱ्याला गेट न लावल्याने शेतकऱ्यांना आता असे म्हणावे लागत आहे.
पाऊस आला धावून
गेट नसल्याने पाणी गेले वाहून.. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तसेच माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी हिंगोली जिल्ह्यातील ज्यां ठिकाणी बंधाऱ्यावर गेट बसवले नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असे मत सामाजिक कार्यकर्ते तसेच पत्रकार शिवाजी कऱ्हाळे व अनेक शेतकऱ्याकडून व्यक्त केल्या जात आहे.
हिंगोली जिल्ह्यातील बांधलेल्या बंधाऱ्यावर या चार ते पाच दिवसात गेट न बसवले तर हिंगोली जिल्ह्याचे वाळवंट होण्याला उशीर लागणार नाही.

Check Also

हिंगोलीच्या खेळाडूंची सुवर्णभरारी!तायक्वांदोमध्ये पाच सुवर्ण व सहा रौप्य

हिंगोली,दि 11  परभणी येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालयात रविवार, दिनांक ११ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या …