सेलू दि ३१,(प्रतिनिधी)
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून पोलीस स्मृती दिनानिमित्त सेलू पोलीस ठाण्यात उपक्रम घेण्यात आला.येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयातील विद्यार्थ्यांना सेलू पोलीस ठाण्याच्या वतीने शस्त्रास्त्र माहिती तसेच ठाण्यातील इतर वास्तू बाबत माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी पोलीस निरीक्षक अरुण नागरे,पोलीस कर्मचारी अस्मिता मोरे,सुभाष ढाले आदींची उपस्थिती होती.अस्मिता मोरे यांनी विद्यार्थ्यांना दंगल वगैरे झाल्यानंतर पोलीस काय कारवाई करतात? या वेळी त्यांना कोणते शस्त्र वापरायचे असते.लहान मुलांनी विनापरवाना वाहन चालवल्यास काय कारवाई होते याबाबत मार्गदर्शन केले.पोलीस निरीक्षक अरुण नागरे यांनी विद्यार्थ्यांना पोलिसांचे हेल्मेट,अश्रूधुराच्या नळकांड्या कशा वापरतात,बंदूक,रायफल,पिस्तुल याबाबत मार्गदर्शन केले आणि प्रत्यक्ष ही शस्त्र विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली.तसेच विद्यार्थ्यांच्या मागणीवरून पोलीस ठाण्यात आरोपीस पकडल्यानंतर ज्या कोठडीत ठेवण्यात येते ती देखील दाखवण्यात आली.मार्गदर्शन करतांना अरुण नागरे म्हणाले की,हे शस्त्र, कायदा हा देशाच्या शत्रूला पराभूत करण्यासाठी असतो.तसेच समाजात दंगल भडकल्यास पोलीस काय कारवाई करतात याबाबत सांगितले.पोलीस प्रशासन हे जनतेच्या सुरक्षिततेसाठी आहे.परंतु शांतता भंग करणार्यांवर पोलीस कारवाई करतात याबाबत माहिती दिली.तसेच लहान मुलांनी वाहने चालवू नयेत.याचे पुढील धोकेही त्यांनी सांगितले.दि २२ ओक्टॉबर ते ३१ ओक्टॉबर दरम्यान पोलीस स्मृती दिनानिमित्त सेलू पोलीस ठाण्याच्या वतीने विविध उपक्रम घेण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वितेआठी पोलीस कर्मचारी अस्मिता मोरे,सुभाष ढाले,सोपान बारवकर,गजानन बंदुके,पोलीस कर्मचारी अजीस आदींनी परिश्रम घेतले.
Shabdraj www.shabdraj.com