16/10/26
Breaking News

ग्रामीण भागातील मतदारांचा सतीश चव्हाण यांना पाठींबा 

परभणी,दि 11
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार आमदार सतीशभाऊ चव्हाण यांच्या प्रचाराला ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळत असून विविध शिक्षक,प्राध्यापक संघटनांच्या प्रतिनिधींनी युवकांशी संवाद साधत आमदार चव्हाण यांच्या कार्यकाळातील कामांची माहीती दिली.

आमदार चव्हाण यांच्या कार्याची माहीती पदवीधरापर्यंत पोहचविण्यासाठी प्राध्यापक मंडळी सरसावली आहे.रविवारी  महातपुरी, खळी, गौंडगाव, दुसलगाव, शंकरवाडी, रामनगर तांडा, रुमना आणि जवळा या गावांना भेटी देऊन पदवीधर मतदारांशी संवाद साधला. आमदार सतीश चव्हाण यांनी मागील 18 वर्षात केलेल्या  वैद्यकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची माहिती दिली. तसेच बेरोजगार युवकांसाठी आयोजित केलेले रोजगार मेळावे आणि छत्रपती संभाजीनगर येथे विधी विद्यापीठाच्या स्थापनेसाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती देत त्यांनी मतदारांशी संवाद साधला. ग्रामीण भागातील पदवीधरांच्या समस्या, त्यांच्या अपेक्षा आणि रोजगाराच्या संधी याबाबतही चर्चा करण्यात आली. नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या अधिक संधी मिळाव्यात आणि समाजातील विविध घटकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न व्हावेत, या दृष्टीने केलेल्या कार्याचा त्यांनी उल्लेख केला. शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांची जाण ठेवून पदवीधरांच्या हितासाठी सातत्याने कार्य करण्याची भूमिका त्यांनी यावेळी मांडली.
छत्रपती संभाजीनगर येथील विधी विद्यापीठाचा उल्लेख
मराठवाड्यातील उच्च शिक्षणाच्या विकासाच्या दृष्टीने छत्रपती संभाजीनगर येथील विधी विद्यापीठ स्थापनेत आमदार चव्हाण यांचा मोलाचा वाटा आहे.चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे विद्यापीठ स्थापन झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.
ग्रामीण भागात प्रत्यक्ष भेटी देऊन मतदारांशी संवाद साधण्याच्या या प्रचार मोहिमेमुळे निवडणुकीच्या वातावरणात उत्साह निर्माण झाला आहे.महायुतीच्या प्रचाराला ग्रामीण भागात प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र या दौऱ्यातून समोर आले.

Check Also

तुम्ही आमच्या पिढ्या उध्वस्त करायच्या आणि त्याला आम्ही विकास म्हणायचं का? राजू शेट्टी यांचा घणाघाती हल्ला

  वसमत,दि 17 मूठभर भांडवलदारांना खुष करण्यासाठी प्रास्तावित असलेला शक्तीपीठ हा फक्त महामार्ग नाही, तर …