हिंगोली,दि 11
परभणी येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालयात रविवार, दिनांक ११ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या प्रो तायक्वांदो व कराटे अजिंक्यपद स्पर्धेत समृद्धी युथ अँड स्पोर्ट्स फाउंडेशन, हिंगोलीच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले. तायक्वांदो आणि कराटे या दोन्ही क्रीडाप्रकारांत खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट कौशल्याची चमक दाखवत सुवर्ण व रौप्यपदकांची कमाई केली. या यशामुळे हिंगोलीच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या स्पर्धेत प्रशिक्षिका समृद्धी कदम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. नियमित सराव, शिस्त, जिद्द, आत्मविश्वास आणि योग्य तांत्रिक प्रशिक्षणाच्या जोरावर खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्यांना तगडी लढत देत पदकांवर आपले नाव कोरले.
तायक्वांदो या क्रीडाप्रकारात समृद्धीच्या खेळाडूंनी आपापल्या वजन गटांत उत्कृष्ट प्रदर्शन करत एकूण पाच सुवर्णपदके आणि सहा रौप्यपदके मिळवली.
मुलांच्या गटातील पदकविजेते :
१. रियांश अन्नपुरे – रौप्यपदक
२. समर्थ राठोड – सुवर्णपदक
३. सेवालाल राठोड – सुवर्णपदक
४. शौर्य महाजन – सुवर्णपदक
५. श्री आत्तरकर – सुवर्णपदक
६. प्रियांश देवकर – सुवर्णपदक
७. संदेश खिल्लारे – रौप्यपदक
मुलींच्या गटातील पदकविजेत्या :
१. दिव्यंका महाजन – रौप्यपदक
२. अक्षरा महाजन – सुवर्णपदक
३. कृष्णाली देवकर – रौप्यपदक
४. शरयू केंद्रेकर – रौप्यपदक
५. प्रांजल पाटील – रौप्यपदक
कराटेमध्येही सुवर्णपदकांची कमाई
तायक्वांदोसोबतच कराटे या क्रीडाप्रकारातही खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. प्रांजल पाटील आणि संदेश खिल्लारे यांनी त्यांच्या गटामध्ये सुवर्णपदक पटकावून आपल्या क्रीडाकौशल्याची छाप पाडली.
या यशामागे प्रशिक्षिका समृद्धी कदम यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आहे.या सर्व पदकविजेत्या खेळाडूंचे एक्सलंट तायक्वांदो असोसिएशन, हिंगोलीचे अध्यक्ष जगजीतराज खुराना, मार्गदर्शक टी. के. ठोंबरे, सचिव प्रकाश अडकिने, सहसचिव बजरंग कदम तसेच समृद्धी युथ अँड स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

Shabdraj www.shabdraj.com