16/10/26
Breaking News

CBSE च्या 2027 परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक पाहा, कधी असू शकते परीक्षा ?

सीबीएसई दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना विषयानुसार परीक्षेच्या तारखा, वेळ आणि इतर माहिती लवकरच मिळणार आहे. जोपर्यंत अंतिम वेळापत्रक जाहीर होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांनी सीबीएसईच्या गेल्या वेळच्या वेळापत्रक आणि सँपल प्रश्न पत्रिकांचा वापर 2026-27 च्या परीक्षांची तयारी करण्यासाठी करता येणार आहे. केंद्रिय बोर्ड 2027 परीक्षा फेब्रुवारी आणि मार्चमध्ये होऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर होताच तारीख, वेळ आणि इतर सूचनांचे वाचन काळजीपूर्वक करावे…

सीबीएसई (CBSE) संलग्न शाळा सध्या 2026-27 या शैक्षणिक सत्रासाठी नोंदणी आणि उमेदवारांची यादी (LOC) तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण करत आहेत. मात्र, परीक्षेची तयारी सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांनी अंतिम वेळापत्रकाची वाट पाहण्याची गरज नाही.

सीबीएसई 2027 च्या संभाव्य परीक्षांचे वेळापत्रक – केव्हा  होणार परीक्षा ?

परीक्षांची तयार करण्यासाठी गेल्यावर्षीच्या सीबीएसई (CBSE)च्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक तुम्ही पाहू शकता. परीक्षांची अंतिम तारीख फेब्रुवारी आणि मार्च दरम्यान जाहीर होऊ शकते.

जवळपास 45 लाख विद्यार्थी CBSE Class 10 आणि Class 12 वीच्या 2027 बोर्डाच्या परीक्षांना बसण्याची शक्यता आहे. प्रत्येक पेपरला अडीच तासांचा वेळ असणार आहे.

CBSE Class 10, 12 च्या 2027 वेळापत्रक कसे डाऊनलोड करावे

CBSE च्या अधिकृत website ला cbse.nic.in.भेट द्या

होमपेज ओपन करा आणि त्यात CBSE Datesheet 2027 ची PDF link शोधा

टाईमटेबलची लिंकला क्लिक करा

प्रत्येक विषयाच्या पेपरचे तारखा चेक करा

एक्झामिनेशन वेळ, विषयाचे नाव आणि विषयांचा कोड चेक करा

एक्झामिनेशन डेच्या सूचनांचे पीडीएफ तपासा

पुढील कामासाठी याचे प्रिंटआऊट काढून ठेवा

Check Also

केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदलाचे वारे

केंद्र सरकारमधील मोदी मंत्रिमंडळात लवकरच मोठ्या फेरबदलाचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. भारतीय जनता पक्षाने …