16/11/26
Breaking News

देशातील सोन्याबद्दल हादरवणारी माहिती समोर;हॉलमार्कमध्ये….

भारतात सण असो किंवा इतर प्रसंग इथे मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करण्यात येते.हॉलमार्कमध्ये शुद्ध सोन्याची गॅरेंटी असं मानलं जातं. पण आता याच सोन्याबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. कॅगच्या अहवालातून सोन्याबद्दल महत्त्वाची आणि धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या रिपोर्टनुसार देशातील BIS ने 83 टक्क्याहून अधिक सोन्याची दुकाने तपासलेली नाही. या बातमीनंतर एकच खळबळ माजली आहे. तर ग्राहकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

रिपोर्टमधून काय समोर आलंय?

भारतीय मानक ब्युरो म्हणजे BIS ही भारतातील अशी संस्था आहे जी सराफ दुकानांची वर्षातून एकदा तपासणी करतात. या तपासणी दरम्यान दुकानातील सोन्याच्या दागिण्याची शुद्धता तपासली जाते. पण कॅगच्या रिपोर्टनुसार गेल्या पाच वर्षांमध्ये 2020- 21 ते 2024-25 मध्ये या दरम्यान  83 टक्क्याहून अधिक सोन्याच्या दुकान्यातील सोन्याची तपासणी केलेली नाही.
रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे, त्यानुसार देशभरातील 392 जिल्ह्यांमध्ये हॉलमार्कशिवाय सोने विकणे बेकायदेशीर आहे.  म्हणूनच सुमारे 2.3 लाख दागिन्यांच्या दुकानांनी बीआयएस (BIS) कडे नोंदणी करण्यात आली आहे.  रिपोर्टनुसार 2024-25 मध्ये एकूण 28,865 परवानाधारक होते. पण त्यापैकी फक्त 5,444 जणांची तपासणी करण्यात आली आहे.  याचा अर्थ असा की सुमारे 81% दुकानदारांची कोणीही तपासणी झालेली नाही.

Check Also

‘विलीनीकरणाला फुलस्टॉप…’खासदार सुप्रिया सुळे यांनी केला सर्वात मोठा खुलासा

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट आणि अजित पवार गट) पुन्हा …