परभणी,दि 19 ः
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजी नगर संचालित श्री शिवाजी विधी महाविद्यालय परभणी येथे गुरुवार दिनांक १७ जुलै रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू मा.डॉ. मनोहरजी. चासकर तसेच विद्यापीठाचे प्र. कुलगुरू मा. डॉ. अशोकजी महाजन यांनी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार यांचीही उपस्थिती होती. या भेटीदरम्यान मा.कुलगुरू व प्र कुलगुरू यांनी महाविद्यालयाच्या समस्या जाणून घेतल्या व त्या त्वरित सोडवण्याचे आश्वासन दिले. महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. एम. एल. धर्मापुरीकर यांच्या हस्ते मा.कुलगुरू, प्र. कुलगुरू, कुलसचिव तसेच विद्यापीठ व्यवस्थापन परिषेदेचे सदस्य श्री नारायणरावजी चौधरी व सिनेट सदस्य डॉ. रामेश्वर पवार यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री प्रकाशजी सोळंके सचिव माननीय श्री सतीशजी चव्हाण महाविद्यालय विकास समिती प्रमुख सदस्य माननीय श्री चंद्रशेखरजी नखाते यांनी समाधान व्यक्त केले व महाविद्यालयाच्या पुढील वाटचालीमध्ये विद्यापीठाच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.याप्रसंगी श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव, अधिष्ठाता डॉ.एम. के. पाटील, डॉ. पेदेवाड महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
Shabdraj www.shabdraj.com