23/08/26
Breaking News

मंत्र्याच्या वक्तव्याचा सेलूत शिवा संघटनेच्या वतीने निषेध

सेलू / प्रतिनिधी – राज्याचे समाज कल्याण मंत्री संजय सिरसाट यांनी जगतज्योती क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वरांचा विधिमंडळ सभागृहात बोलताना केलेल्या ऐकेरी उल्लेखाचा अखिल भारतीय विरशैव शिवा संघटना तालुका शाखा सेलूच्या वतीने तहसिलदारांना निवेदन देऊन जाहिर निषेध करण्यात आला.

 

निवेदनात म्हटले आहे की संजय सिरसाटांनी महात्मा बसवेश्वरांचा ऐकेरी उल्लेख करून त्यांचा घोर अपमान केला आहे, त्यामुळे विरशैव समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत , त्यामुळे त्यांनी विरशैव समाजाची जाहिर माफी मागावी अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर उपजिल्हा प्रमुख शिवकुमार नावाडे, तालुकाध्यक्ष निजिलिंगआप्पा तरवडगे, शंकर राऊत , प्रकाश साखरे, अशोक मसुरे, सुजीत मिटकरी, कैलास स्वामी, बबन आप्पा झमकडे, गणेश केशरखाने, रामदास पाटील, दादाराव चौरे, सुनील नवघरे, गणेश सूर्यवंशी, सखाराम कानडे, विश्वनाथ साखरे, मनोहर चलोदे, देवराव चौरे, प्रकाश कोलीपाका, गुरबसआप्पा पंचगल्ले ,रामा कटारे आदी समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Check Also

टोलेजंग इमारत सज्ज, तरी वाचक प्रतीक्षेत! हिंगोलीतील नवीन जिल्हा ग्रंथालयाचे उद्घाटन कधी?

​हिंगोली (विशेष प्रतिनिधी): हिंगोली शहरातील महसूल कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभारण्यात आलेली जिल्हा ग्रंथालयाची भव्य आणि …