04/02/26
Breaking News

‘छावा’च्या पदाधिकार्‍यांवरील हल्ल्याचा परभणीत जोरदार निषेध

परभणी,दि.21(प्रतिनिधी) : छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय गाडगे यांच्यासह सहकार्‍यांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी भर दिवसा वरिष्ठ नेतेमंडळींसमोर केलेल्या अमानुष मारहाणीचा येथील मराठा सेवा मंडळ, संभाजी ब्रिगेड, छावा संघटना यासह अन्य संघटनांनी सोमवारी (दि.21) संयुक्तपणे जोरदार निदर्शने करीत निषेध व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे व सुरज चव्हाण यांच्या प्रतिमांना या संतप्त आंदोलनकर्त्यांनी जोडे मारले. गुंडगिरी बंद करा, शेतकरीद्रोह्यांना अटक करा, अशी जोरदार घोषणाबाजी आंदोलनकर्त्यांनी केली. या हल्ल्याची सीआयडीमार्फत चौकशी व्हावी, गुन्हेगारांना अटक करावी, राजकीय अभय देणार्‍या नेतेमंडळींची चौकशी करावी, प्रत्येक जिल्ह्यात गुंडगिरी विरोधी सेल स्थापन करावा, अशी मागणी या संघटनांनी केली.
मराठा सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नितीन देशमुख, संभाजी ब्रिगेडचे महानगराध्यक्ष गजानन जोगदंड, जिल्हाध्यक्ष बालाजी मोहिते, छावा दलाचे जिल्हाप्रमुख रामदास पवार, शिवमुद्रा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सूर्यकांत मोगल, मराठा महासंघाचे जिल्हाप्रमुख संदीप गव्हाणे, मराठा परिवाराचे अमोल अवकाळे, गोहरक्षक सुरेश लोहट, मराठा समन्वय स्वप्नील गरुड, विद्यार्थी परिषद जिल्हाप्रमुख पांडुरंग शिंदे, मराठा समन्वयक रमेश देशमुख, गोविंद इक्कर, एकनाथ मोरे, विष्णू लोडे, कृष्णा अवकले, विशाल सूर्यवंशी, गणेश चोपडे यांच्यासह अन्य मंडळींनी या आंदोलनात सहभाग नोंदवला.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …