04/02/26
Breaking News

अतिवृष्टीग्रस्त गावांना आ.राजेश विटेकर यांच्या भेटी, पंचनाम्याबाबत दिल्या सूचना.

परभणी,दि 22  (प्रतिनिधी)
पाथरी विधानसभा मतदारसंघातील अनेक महसूल मंडळात 21 जुलै रात्री मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने काही ठिकाणी घरात पाणी शिरले तर अनेक शेतात पाणी साचले, काही ठिकाणी बांध फुटून शेती खरडून गेली आ राजेश विटेकर आज सकाळी सोनपेठ व पाथरी तालुक्यातील अनेक गावांना भेट देऊन अतिवृष्टी ग्रस्त शेतीची पाहणी केली.

 

सोनपेठ महसूल मंडळात 136 ,हदगाव 106., कासापुरी 215, बाभळगाव 98, केकरजवळा 98 अशी अतिवृष्टी झाली आहे.काल रात्री पासुन सोनपेठ, पाथरी व मानवत तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे त्यामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झालेले आहे. आ विटेकर यांनी तहसीलदार सुनिल कावरखे यांच्यासह आज सोनपेठ तालुक्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली जिल्हाधिकारी यांना फोन करून सर्व परिस्थिती लक्षात आणून पंचनामे करण्याबाबत बोलणे केले.

तर पाथरी तालुक्यातील हदगाव येथे इंदिरानगर येथे घरात पाणी शिरले त्यामुळे नागरिकाचे मोठे नुकसान झाले तसेच शेतीचेही मोठे नुकसान झाले, दुपारी कासापुरी, पाथरगव्हाण वाडी तेथे जाऊन हि आ विटेकर यांनी भेट देऊन पाहणी केली, त्यावेळी उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण, सभापती अनिल नखाते, अजिंक्य नखाते, तहसीलदार हंडेश्वर पोलिस निरीक्षक लांडगे, यांच्या सह उपस्थित होते आ विटेकर यांनी उपजिल्हाधिकारी श्रीमती चव्हाण यांना पाथरी विधानसभा मतदारसंघातील अतिवृष्टी भागातील शेती घरे यांचे पंचनामे करण्या बाबत सूचना केल्या

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …